‘सोलर रुफटॉप’ योजनेसाठी जनजागृतीपर मेळावे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘सोलर रुफटॉप’ योजनेसाठी जनजागृतीपर मेळावे
‘सोलर रुफटॉप’ योजनेसाठी जनजागृतीपर मेळावे

‘सोलर रुफटॉप’ योजनेसाठी जनजागृतीपर मेळावे

sakal_logo
By

कल्याण, ता. २० (बातमीदार) : केंद्र सरकारचे नवीकरणीय ऊर्जा मंत्रालय, महाराष्ट्र शासन व महावितरण यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यात ‘सोलर रुफटॉप’ योजना राबविण्यात येत आहे. या योजनेच्या माध्यमातून घराच्या छतावर सौरऊर्जा प्रकल्प उभारून स्वत: वीजनिर्मिती करून तिचा वापर करण्याची संधी ग्राहकांना उपलब्ध आहे. अधिकाधिक ग्राहकांनी या योजनेत सहभाग घ्यावा, यासाठी महावितरणच्या कल्याण परिमंडलात मेळाव्यांचे आयोजन करून जनजागृती करण्यात येत आहे.
विजेचा स्वत:साठी वापर व अतिरिक्त विजेची विक्री अशी सोलर रुफटॉप योजनेची संकल्पना आहे. त्यासाठी उच्चदाब व लघुदाब वर्गवारीतील घरगुती, व्यावसायिक, औद्योगिक, सार्वजनिक सेवा आदी ग्राहक अर्ज करू शकतात. यात केवळ घरगुती ग्राहकांसाठी अनुदानाची तरतूद आहे. योजनेच्या लाभासाठी https://www.mahadiscom.in/ismart या संकेतस्थळावर लॉगीन करून आवश्यक माहितीचा तपशील भरता येतो. अर्जाची प्रक्रिया पूर्ण करून कंत्राटदाराची निवडही लाभार्थ्यांनीच करावयाची आहे. या सर्व सुविधा ऑनलाईन पोर्टलवर उपलब्ध आहेत. याशिवाय https://solarrooftop.gov.in/ या केंद्र सरकारच्या पोर्टलवरही ऑनलाईन अर्ज करण्याची सुविधा आहे. या योजनेच्या कामांसाठी कल्याण परिमंडलात १०२ कंत्राटदार सुचिबद्ध करण्यात आले आहेत. ग्राहकांना वीजबिलात बचत आणि या अतिरिक्त उत्पन्नाची संधी देणाऱ्या या योजनेत अधिकाधिक ग्राहकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन मुख्य अभियंता धनंजय औंढेकर यांनी केले आहे.