शेलवली येथे श्रमदानातून वनराई बंधारे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शेलवली येथे श्रमदानातून वनराई बंधारे
शेलवली येथे श्रमदानातून वनराई बंधारे

शेलवली येथे श्रमदानातून वनराई बंधारे

sakal_logo
By

किन्हवली, ता. २० (बातमीदार) : शहापूर वन विभागाच्या कार्यक्षेत्रातील धसई वन परिमंडळ आणि डोंबिवली येथील वंदे मातरम महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने शेलवली हद्दीतील ओहळांचे पाणी अडविण्यासाठी तीन ठिकाणी श्रमदानाने वनराई बंधारे बांधण्यात आले. यासाठी वन परिक्षेत्र अधिकारी दर्शन ठाकूर यांचे मार्गदर्शन लाभले.
या वेळी शिबिरातील विद्यार्थ्यांना पक्षी अभ्यासक रोहिदास डगळे यांनी पर्यावरण संवर्धन, पक्षी सप्ताह, पक्षी निरीक्षण अशा विविध विषयांवर मोलाचे मार्गदर्शन केले. धसई वनपरिक्षेत्र कार्यालयाने गेल्या वर्षीही विविध महाविद्यालये, सामाजिक, शैक्षणिक व पत्रकार संघटनांच्या विद्यमाने विविध ठिकाणच्या पाणवठ्यांवर २६ पेक्षा जास्त वनबंधारे बांधले होते. त्याचा फायदा तीव्र उन्हाळ्यातील पाणीटंचाईच्या काळात अनेक पशू-पक्ष्यांना झाला होता.