भात झोडणीची कामे अंतिम टप्प्यात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

भात झोडणीची कामे अंतिम टप्प्यात
भात झोडणीची कामे अंतिम टप्प्यात

भात झोडणीची कामे अंतिम टप्प्यात

sakal_logo
By

वज्रेश्वरी, ता. २३ (बातमीदार) : दिवाळीनंतर सुरू झालेली भातकापणी जवळपास संपत आली असून भात झोडणीची कामेही अंतिम टप्प्यात आली आहेत. या वर्षी उत्पादनात वाढ झाली असल्याचे शेतकऱ्यांकडून सांगितले जात आहे.

दिवाळीनंतर रोजगारासाठी मजुरांचे स्थलांतर होण्यापूर्वीच येथील शेतकऱ्यांनी भात झोडणीच्या कामांना सुरुवात केली आहे. काही शेतकरी भात लावणी, भात कापणी यंत्राद्वारे करीत असतात. मात्र, भात झोडणीचे यंत्र ग्रामीण भागात फारसे उपलब्ध होत नसल्याने भाताची झोडणी मजुरांद्वारेच करावी लागत आहे. भिवंडी तालुक्यात सर्वत्रच झोडणीची कामे सुरू असून भाताचे उत्पादनही वाढले असल्याने शेतकरी समाधान व्यक्त करीत आहेत. भातकापणी आटोपली असल्याने रब्बीमध्ये वाल, हरभरा, मूग, तूर, तीळ अशा वाणांची जोरदार पेरणी सुरू आहे. अत्यंत कमी मजुरी, कमी खर्चात हे उत्पन्न मिळत असल्याने ठाणे ग्रामीण भागात रब्बी हंगामात १० हजार हेक्टरवर कडधान्याची पेरणी होत असते.