उल्हासनगरातील उपोषणाने पाण्याचा मार्ग मोकळा, | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

उल्हासनगरातील उपोषणाने पाण्याचा मार्ग मोकळा,
उल्हासनगरातील उपोषणाने पाण्याचा मार्ग मोकळा,

उल्हासनगरातील उपोषणाने पाण्याचा मार्ग मोकळा,

sakal_logo
By

उल्हासनगर, ता. २१ (वार्ताहर) : सामाजिक कार्यकर्त्यांनी केलेल्या तीन दिवसांच्या आमरण उपोषणाचे सकारात्मक पडसाद उमटले आहेत. आमदार गणपत गायकवाड यांनी उपोषणस्थळी भेट देऊन अधिकाऱ्यांना आदेश दिल्यावर आणि पालिकेने रितसर लेखी आश्वासन दिल्याने उल्हासनगरातील पॅनेल १४ मधील अनेक परिसरांचा पाण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
गुलमोहर नगर, मानस नर्सिंग होम सी ब्लॉक, एकवीरा कॉलनी, गणेश कॉलनी, शंकर कॉलनी, साईनाथ कॉलनी, ओम साईनाथ कॉलनी, मीनाक्षी अपार्टमेंट व इतर अनेक परिसरांत पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली होती. याबाबत पालिकेकडे निवेदनाद्वारे लक्ष वेधल्यावरही त्याकडे दुर्लक्ष करण्यात येत असल्याने सामाजिक कार्यकर्ते सुनील तांबेकर, तुकाराम मन्सुलकर, स्नेहल राणे यांनी समर्थकांसह तीन दिवस आमरण उपोषण केले होते.
उपोषणस्थळी आमदार गणपत गायकवाड, पालिकेचे अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर, पाणीपुरवठा अभियंता राजेश वानखेडे, अधिकारी बी. एस. पाटील यांनी भेट दिली. आमदार गायकवाड यांनी उपोषणकर्ते यांच्याकडून पाण्याची माहिती घेतल्यावर अधिकाऱ्यांना यावर तात्काळ उपाययोजना करण्याचे आदेश दिले. त्यानुसार समाधान मेडिकल ते मास्टर किड्स प्ले स्कूल रस्त्याच्या मध्यभागी ज्या नवीन ड्रममध्ये नळाच्या लाईन सोडण्यात आल्या आहेत त्या रद्द करून मेन लाईनला जोडण्यात येणार व मीनाक्षी अपार्टमेंटची चालू लाईन कापण्यात आली होती, ती देखील तातडीने जोडण्यात येणार आहे. तसेच ब्ल्यू पाण्याची लाईन संपूर्ण परिसरात अंतर गॅप भरून चालू करण्यात येणार, असे लेखी आश्वासन पालिकेने उपोषणकर्ते सुनील तांबेकर, तुकाराम मन्सुलकर, स्नेहल राणे यांना दिल्यावर तीन दिवसांनंतर उपोषणाची सांगता करण्यात आली. यावेळी डॉ. बाबासाहेब पाटील, भाजपचे मंडळ अध्यक्ष नीलेश बोबडे आदी उपस्थित होते.