शेअर ट्रेडिंगमार्फत कोट्यवधीची फसवणूक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शेअर ट्रेडिंगमार्फत कोट्यवधीची फसवणूक
शेअर ट्रेडिंगमार्फत कोट्यवधीची फसवणूक

शेअर ट्रेडिंगमार्फत कोट्यवधीची फसवणूक

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २० : वृद्ध महिलेची ३.१४ कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी ४४ वर्षीय शेअर ट्रेडिंग एजंटला शनिवारी (ता. १९) बोरिवली पोलिसांनी दिल्लीतून अटक केली. या प्रकरणात आरोपीने तक्रारदार महिला सेलिनो पिंटोची फसवणूक करत पैसे बनावट डिमॅट खात्यात वळते केल्याचा आरोप आहे. आरोपी नरेश भरत सिंग याने बोरिवली पोलिसांकडे तशी गुन्ह्याची कबुली दिली आहे. कोरोना काळात नोकरी गमावल्यानंतर उदरनिर्वाहासाठी हे कृत्य केल्याचे त्याने सांगितले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी ७७ वर्षीय महिला सेलिनो पिंटो ज्येष्ठ नागरिक असून त्या बोरिवली पश्चिम येथील शिंपोली भागात राहतात. त्यांच्याकडे १६ वेगवेगळ्या कंपन्यांचे ३.१४ कोटी रुपयांचे शेअर्स आहेत. अकाऊंटमधील नाव आणि पत्त्यातील बदलाबाबत शेअर ट्रेडिंग कंपनीने पिंटो यांना फसवणुकीबद्दल अलर्ट देत सावधान केले. त्यानंतर त्यांनी पोलिसांकडे धाव घेतली. आरोपीने महिलेच्या नावाने बनावट आधार कार्डही बनवले होते.
...
शेअर हस्तांतरित करून विक्री
सेलिनो पिंटो या महिलेचे शेअर्स आरोपीने ग्लोबल कॅपिटल मार्केटिंग नामक कंपनीच्या दुसऱ्या डिमॅट खात्यात हस्तांतरित केल्याचे पोलिसांना आढळून आले. तेथून आरोपीने सर्व शेअर्स विकले आणि संपूर्ण रक्कम विलेपार्ले येथील रहिवासी चंद्रकांत शहा यांच्या डिमॅट खात्यात ट्रान्सफर केली. पोलिसांनी चंद्रकांत शहा यांच्या पत्त्यावर संपर्क साधला असता कळले की, चंद्रकांत शहा यांचा २०१७ मध्ये मृत्यू झाला आहे.