टँकरच्या धडकेत तरुणाचा मृत्यू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

टँकरच्या धडकेत तरुणाचा मृत्यू
टँकरच्या धडकेत तरुणाचा मृत्यू

टँकरच्या धडकेत तरुणाचा मृत्यू

sakal_logo
By

मानखुर्द, ता. २० (बातमीदार) ः चेंबूरच्या वाशी नाका येथील पेट्रोल पंपासमोर टँकरच्या धडकेत साईनाथ इरकर या तरुणाचा मृत्यू झाला. बीएससी ॲनिमेशनचे शिक्षण घेत असलेला साईनाथ शनिवारी (ता. १९) दुपारी शाळेतून घरी परतत असताना त्याचा अपघात होऊन जागीच मृत्यू झाला. आरसीएफ पोलिसांनी त्याचा मृतदेह ताब्यात घेऊन उत्तरिय तपासणीसाठी घाटकोपरच्या राजावाडी रुग्णालयात पाठवून दिला. आरसीएफ पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली असून चौकशीनंतर पुढील कारवाई पोलिस करणार आहेत.