ऐरोलीतील रस्त्यांचे डांबरीकरणाला सुरुवात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ऐरोलीतील रस्त्यांचे डांबरीकरणाला सुरुवात
ऐरोलीतील रस्त्यांचे डांबरीकरणाला सुरुवात

ऐरोलीतील रस्त्यांचे डांबरीकरणाला सुरुवात

sakal_logo
By

वाशी, ता. २० (बातमीदार) : ऐरोली सेक्टर ४ येथे मे महिन्यामध्ये मलनि:सारण वाहिन्या टाकण्यात आल्या होत्या. ज्या ठिकाणी मलनि:सारण वाहिन्या टाकण्यात आल्या होत्या. त्या रस्त्यांची दयनीय अवस्था झाली होती. त्यामुळे रस्त्याचे डांबरीकरण करण्याची मागणी माजी नगरसेविका हेमांगी सोनवणे यांनी पालिका प्रशासनाकडे वारंवार केली होती. अखेर याची दखल घेत प्रशासनाने रस्त्यांचे डांबरीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. आर रो हाऊसचा अर्धा भाग, जनता मार्केट ते फायर स्टेशनपर्यंतचा रस्ता डांबरीकरण करण्यात येणार आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सदस्य अंकुश सोनवणे व हेमांगी सोनवणे यांच्या हस्ते रविवारी (ता. २०) या रस्ते डांबरीकरण कामाचे उद्‍घाटन करण्यात आले. या वेळी मिलिंद कांबळे, बाळासाहेब कोकाटे, ज्ञानेश्वर झावरे, विलास हुले, राजेंद्र बुरखे, संदानशिव, गंगाराम मोरे, सायगावकर, वैभव देशमुख, विशाल पाटील, हभप नारायण केसकर, बिंदू केसरकर उपस्थित होते.