महाविकास आघाडीतर्फे राज्यपालांचा निषेध | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

महाविकास आघाडीतर्फे राज्यपालांचा निषेध
महाविकास आघाडीतर्फे राज्यपालांचा निषेध

महाविकास आघाडीतर्फे राज्यपालांचा निषेध

sakal_logo
By

वाशी, ता. २० (बातमीदार) : छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त वक्तव्यप्रकरणी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याविरोधात महाविकास आघाडी आक्रमक झाली आहे. नवी मुंबईतही ठाकरे गट महाविकास आघाडीच्या माजी लोकप्रतिनिधी, कार्यकर्त्यांनी राज्यपालांच्या वक्तव्याचा घोषणाबाजीने निषेध केला.
वाशीतील छत्रपती शिवाजी महाराज चौकात तीव्र घोषणाबाजी करण्यात आली. शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाचे ज्येष्ठ नेते विठ्ठल मोरे, राष्ट्रवादीचे नवी मुंबई शहराध्यक्ष नामदेव भगत, माजी नगरसेवक सोमनाथ वास्कर, काँग्रेसचे नेते सुरेश शेट्टी या प्रमुख नेत्यांसह युवा कार्यकर्ते आणि महिला कार्यकर्त्या मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. महाराष्ट्राच्या राज्यपालपदी तीन वर्षांहून अधिक काळ राहूनही राज्यपाल महोदयांना छत्रपती शिवाजी महाराज समजत नसतील, महाराष्ट्र व महाराष्ट्राची लोकभावना कळत नसेल, तर राज्यपाल कोश्यारी यांनी आधी इतिहास जाणून घ्यावा. त्यानंतर बेताल वक्तव्य करावे, असे महाविकास आघाडीच्या नेत्यांनी राज्यपालांना सूचित केले. राज्यातील शिंदे फडणवीस सरकारने याबाबत गांभीर्याने विचार करून छत्रपती शिवरायांचा अवमान करणाऱ्यांना त्यांची जागा दाखवावी; अन्यथा तीव्र आंदोलन करू, असा इशारा महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी आंदोलनात दिला.