महामार्ग ओलांडणाऱ्या चालकाचा अपघाती मृत्यू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

महामार्ग ओलांडणाऱ्या चालकाचा अपघाती मृत्यू
महामार्ग ओलांडणाऱ्या चालकाचा अपघाती मृत्यू

महामार्ग ओलांडणाऱ्या चालकाचा अपघाती मृत्यू

sakal_logo
By

मनोर, ता. २० (बातमीदार) : मुंबई-अहमदाबाद महामार्गावर मस्तान नाका उड्डाणपुलाजवळ अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत ट्रकचालकाचा मृत्यू झाला; तर अपघातस्थळी मदतीसाठी आलेल्या दुचाकीस्वारांना भरधाव वेगातील जीपने धडक दिल्याने दोघे गंभीर जखमी झाले आहेत.

तौफिक खान (वय २१) हा चालक गुजरात वाहिनीवरील उताराजवळील सिमला इन हॉटेलच्या पार्किंगमध्ये ट्रक उभा करून रविवारी (ता. २०) पहाटे २.३० वाजण्याच्या सुमारास एटीएममधून पैसे काढण्यासाठी गेला होता. महामार्ग ओलांडत परतत असताना त्याला अज्ञात वाहनाने धडक दिल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच मनोर पोलिस घटनास्थळी दाखल झाले होते. दरम्यान, मस्तान नाक्यावरील शाह आलम हॉटेलचे कर्मचारी दुचाकीवरून टाकवहाल गावाकडे जात होते. अपघातस्थळी पोलिसांना मदत करण्यासाठी थांबले होते. या वेळी गुजरातच्या दिशेने जात असलेल्या भरधाव वेगातील जीपने (एमएच १० डीके ६४७) त्यांच्या दुचाकीला धडक दिल्यानंतर घटनास्थळी असलेल्या रुग्णवाहिकेला धडक दिली. या अपघातात दुचाकीवरील अताउल्लाह खान आणि भावेश दळवी यांना जबर दुखापत झाली आहे. अताउल्ला याला मुंबईमध्ये; तर भावेश याला उपचारांसाठी गुजरातमधील रुग्णालयात हलवण्यात आले आहे.