राहुल गांधीच्या गुजरात प्रचार दौऱ्यामुळे ‘भारत जोडो’ला दोन दिवसाचा ब्रेक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

राहुल गांधीच्या गुजरात प्रचार दौऱ्यामुळे ‘भारत जोडो’ला दोन दिवसाचा ब्रेक
राहुल गांधीच्या गुजरात प्रचार दौऱ्यामुळे ‘भारत जोडो’ला दोन दिवसाचा ब्रेक

राहुल गांधीच्या गुजरात प्रचार दौऱ्यामुळे ‘भारत जोडो’ला दोन दिवसाचा ब्रेक

sakal_logo
By

मुंबई, ता. २० : गुजरात विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसनेते राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रेला दोन दिवसांचा ब्रेक दिला आहे. यात्रेच्या वेळापत्रकानुसार भारत जोडो यात्रा रविवारी (ता. २०) मध्य प्रदेशाच्या सीमेत प्रवेश करणार होती. मात्र या दौऱ्यात अचानक बदल करण्यात आले असून राहुल गांधी सोमवारी गुजरातमध्ये पहिली प्रचारसभा घेणार आहेत. त्यामुळे भारत जोडो यात्रा रविवारऐवजी बुधवारी (ता. २३) मध्य प्रदेशात प्रवेश करेल.
राहुल गांधी यांच्यासह भारत जोडोची संपूर्ण टीम मध्य प्रदेश आणि महाराष्ट्राच्या बॉर्डरवर असलेल्या जळगाव जामोद येथे थांबलेली आहे. नियोजित वेळापत्रकानुसार भारत जोडो यात्रा रविवारी तिनखुटी या गावातून मध्य प्रदेशमध्ये प्रवेश करणार होती; मात्र अचानक हा दौरा बदलण्यात आला आहे. राहुल गांधी सोमवारी जळगाव जामोद इथून हेलिकॉप्टरने औरंगाबाद विमानतळावर जाणार आहेत. तिथून विशेष विमानाने ते सुरतला रवाना होणार आहेत. दोन प्रचारसभा आटोपून सोमवारीच राहुल संध्याकाळी महाराष्ट्रात परतणार आहेत. बुधवारी जळगाव जामोद इथून भारत जोडो यात्रा पुन्हा सुरू होऊन ती मध्य प्रदेशमध्ये दाखल होईल.