तिसऱ्या दिवशी चौघांचे जबाब नोंदवले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

तिसऱ्या दिवशी चौघांचे जबाब नोंदवले
तिसऱ्या दिवशी चौघांचे जबाब नोंदवले

तिसऱ्या दिवशी चौघांचे जबाब नोंदवले

sakal_logo
By

नालासोपारा, ता. २० (बातमीदार) : श्रद्धा हत्याकांड प्रकरणात तिसऱ्या दिवशीही दिल्ली पोलिस वसईत तळ ठोकून बसले आहेत. आज (ता. २०) चौघांचे जबाब दिल्ली पोलिसांनी नोंदवले आहेत. आजच्या तपासात दिल्ली पोलिसांना काही महत्त्वपूर्ण धागेदोरेही मिळाले असल्याचे सांगण्यात येत आहे.

दिल्ली पोलिसांनी पहिल्या दिवशी माणिकपूर गुन्हे प्रकटीकरण पथकाने तपास केला त्याची माहिती घेतली. काही मित्रांचे जबाब नोंदवले होते. दुसऱ्या दिवशी श्रद्धाला मारहाण झाल्यानंतर तिला मदत केली त्यांचे जबाब घेतले. आज सकाळी श्रद्धा आणि आफताब वसईतील सर्वांत पहिल्या सोसायटीत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये १० महिने राहिले होते, त्या रिगल सोसायटीतील रूम मालकीण जयश्री पाटकर यांचे म्हणणे नोंदवण्यात आले. आफताबचे कुटुंब राहत असलेल्या वसई पश्चिममधील युनिक पार्क सोसायटीचे चेअरमन, सेक्रेटरी यांचा जबाब घेतला. या दोघांची प्रत्येकी एक तास विचारपूसही दिल्ली पोलिसांनी केली. दुपारी ३ वाजल्यानंतर मात्र दिल्ली पोलिस पथक आणि माणिकपूर गुन्हे प्रकटीकरण पथकाने मिरा रोड येथे जात पॅकर्स ॲण्ड मूव्हर्स कंपनीच्या कर्मचाऱ्यांचे जबाब घेतले आहेत. आफताब आणि श्रद्धा दिल्लीला शिफ्ट झाले तेव्हा या कंपनीने त्यांचे सामान नेण्यास मदत केली होती.

श्रद्धा हत्याकांडानंतर आफताब हा गांजा, चरस यासह अन्य अमली पदार्थांचे सेवन करीत असल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे आफताब आणि श्रद्धा राहत होते तिथे त्यांना कोण भेटायला येत होते, रूममध्ये पार्टी वगैरे होत होत्या काय, आफताब नशा करीत होता तर त्याला अमली पदार्थ कोण पुरवठा करत होते, त्यांचे राहणीमान काय होते, घरात या दोघांचे वाद होत होते काय, यावर आज जबाब घेतल्याची पोलिस सूत्रांची माहिती आहे.