कृषी कर्मचाऱ्यांनी साकारला वनराई बंधारा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कृषी कर्मचाऱ्यांनी साकारला वनराई बंधारा
कृषी कर्मचाऱ्यांनी साकारला वनराई बंधारा

कृषी कर्मचाऱ्यांनी साकारला वनराई बंधारा

sakal_logo
By

पडघा, ता. २१ (बातमीदार) : भिवंडी तालुका कृषी अधिकारी गणेश बांबळे व मंडळ अधिकारी आर. डी. शिरसाट यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या अखत्यारीत असलेल्या सर्व क्षेत्रीय कर्मचारी, अधिकारी यांची सभा व आढावा बैठक तालुक्यातील दुर्गम भागात असणाऱ्या वापे येथे घेण्यात आली. त्यांनंतर ‘एक दिवस बळीराजासाठी’ या उपक्रमांतर्गत कृषी सहायक कृषी पर्यवेक्षक अंबाडी, अनगाव कृषी अधिकारी भिवंडी, अंबाडी यांच्या श्रमदानातून वनराई बंधारा साकारण्यात आला. या वनराई बंधाऱ्याचे लाभदायक क्षेत्र १५ हेक्टर असून लाभार्थी शेतकरी संख्या १२ असून भाजीपाला पिके मिरची, भेंडी, मोगरा, आंबा लागवडीसाठी याचा उपयोग होणार आहे. या वेळी श्रमदानासाठी कृषी अधिकारी बांबळे, मंडळ कृषी अधिकारी शिरसाट, पर्यवेक्षक संजय घुडे, बाळकृष्ण गायकवाड, गुरुनाथ शेलार, कृषी सहायक विवेक दोंदे, नरेश बुजड, देवेंद्र गावंडा, हर्षल पाटील, स्नेहल वाळंज, नूतन पाटील, अर्चना धलपे उपस्‍थित होते.