पोलिसांना हुलकावणी देणारा आरोपी गजाआड | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पोलिसांना हुलकावणी देणारा आरोपी गजाआड
पोलिसांना हुलकावणी देणारा आरोपी गजाआड

पोलिसांना हुलकावणी देणारा आरोपी गजाआड

sakal_logo
By

मानखुर्द, ता. २१ (बातमीदार) ः गंभीर गुन्ह्यांत फरारी असलेल्या आरोपीला आरसीएफ पोलिसांनी शनिवारी (ता. १९) रात्री वाशी नाका परिसरातील सह्याद्री नगर ‘ब’ परिसरातून अटक केली. राकेश तिवारी ऊर्फ राक्या असे त्याचे नाव असून त्याने अनेकदा पोलिसांच्या हातावर तुरी देत पळ काढला होता. एका गंभीर गुन्ह्यात हवा असलेला राक्या पोलिसांच्या हातून वारंवार थोडक्यात निसटत होता. शनिवारी उपनिरीक्षक मिलिंद खैरनार यांना त्याच्या ठिकाणाविषयी माहिती मिळाली. त्या माहितीच्या आधारे पोलिस पथकाने सह्याद्री नगर ‘ब’ परिसरात जाऊन त्याला ताब्यात घेत त्याच्या मुसक्या आवळल्या. त्याला पोलिस ठाण्यात आणून त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. त्यानंतर त्याला अटक करण्यात आली.