आदिवासी विद्यार्थ्यांना मदतीचा हात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आदिवासी विद्यार्थ्यांना मदतीचा हात
आदिवासी विद्यार्थ्यांना मदतीचा हात

आदिवासी विद्यार्थ्यांना मदतीचा हात

sakal_logo
By

वाशी, ता. २१ (बातमीदार)ः ‘आजादी का अमृत महोत्सव’ अंतर्गत १९ नोव्हेंबर ते २६ नोव्हेंबर हा सेवा पंधरवडा सुरू आहे. या अंतर्गत मातोश्री अनुसया संभाजी सोनवणे चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून नवी मुंबई महापालिकेचे माजी महापौर सुधाकर सोनवणे यांनी पालघर जिल्ह्यातील अतिदुर्गम भागातील आदिवासी पाड्यातील ७५ जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकणाऱ्या गुणवंत शालेय विद्यार्थ्यांना किट देण्यात आले आहेत.
आजही शिक्षणाच्या मूलभूत सुख-सुविधांसाठी आदिवासी पाड्यातील विद्यार्थ्यांची फरफट होत असते. त्यामुळे माजी महापौर सुधाकर सोनवणे यांनी नवी मुंबईतील रबाळे येथे राजर्षी छत्रपती शाहू महाराज व मान्यवर कांशीरामजी हिंदी विद्यालयाच्या माध्यमातून अत्याधुनिक शिक्षण उपलब्ध करून दिले आहे. तसेच मातोश्री अनुसया संभाजी सोनवणे चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून आदिवासी पाड्यातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदतीचा हात देत पालघर तालुक्यातील विक्रमगडमधील दादडेतील जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप केले आहे.