महामार्गावर अवैध गुटखा जप्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

महामार्गावर अवैध गुटखा जप्त
महामार्गावर अवैध गुटखा जप्त

महामार्गावर अवैध गुटखा जप्त

sakal_logo
By

कासा, ता. २१ (बातमीदार) : मुंबई-अहमदाबाद महामार्गावर चारोटी येथील पेट्रोल पंपासमोर अवैधरित्या वाहतूक करण्यात येणारा गुटखा पकडण्यात आला. कासा पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार एका संशयास्पद कारची झडती घेतली असता त्यामध्ये तंबाखूजन्य गुटखा अवैधरित्या वाहतूक होत असल्याचे आढळले. गुजरातमधून मुंबईकडे हा गुटखा नेत असताना वाहनचालक सुनील गुजर, त्याचा सहकारी यामतुला मुली यांना अटक करण्यात आली. या कारवाईत पोलिसांनी ४६ हजारांचा गुटखा जप्त केला आहे. याबाबत कासा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पुढील कार्यवाही सुरू आहे.