डहाणूत गुजरातहून आले नंदीबैलवाले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

डहाणूत गुजरातहून आले नंदीबैलवाले
डहाणूत गुजरातहून आले नंदीबैलवाले

डहाणूत गुजरातहून आले नंदीबैलवाले

sakal_logo
By

कासा, ता. २१ (बातमीदार) : पूर्वीपासून गावखेड्यात नंदीबैल घेऊन येणारे पाहावयास मिळायचे. गुबुगुबूचा असा आवाज घुमायचा व लहान मुलांसासून ते अगदी वयोवृद्धदेखील नंदीला पाहण्यासाठी गर्दी करायचे; मात्र शहरीकरण झपाट्याने वाढत गेल्याने नंदीबैल घेऊन येणारे दुर्मिळ झाले आहेत, पण गुजरातमधील नंदीबैल सांभाळणारे कोसों मैल प्रवास करत महाराष्ट्रातील सीमेवर असणाऱ्या गावात येत आहेत. तेथे ते नंदीबैलांचा खेळ दाखवून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत आहेत.
गुजरात राज्यात असणाऱ्या सोनगड येथून डहाणू तालुक्यात नंदीबैलवाले बायकोपोरांसह पोटापाण्यासाठी गावखेड्यांत भटकंती करत आहेत. हे नागरिक पावसाळ्यात भातशेतीची कामे करतात, पण सध्या ही कामे पूर्ण झाल्याने उदरनिर्वाहाचा प्रश्न समोर आला असून आपल्या कुटुंबाचे संगोपन करण्यासाठी हे नागरिक आर्थिक कमाईचा मार्ग शोधत फिरत आहेत. कासा येथे बैल घेऊन आलेली सहा ते आठ कुटुंबे आहेत. त्यांनी मोकळ्या जागेत निवाऱ्यासाठी तंबू लावला आहे; तर बैलांना चारापाण्याची व्यवस्था केली आहे. गावातील घरोघरी फिरून ते अन्नधान्य, पैसे गोळा करत आहेत.
---------------
गुजरातहून पालघरमध्ये नंदीबैल घेऊन आम्ही दरवर्षी येत असतो. निवाऱ्यासाठी तंबू व इतर साहित्य सोबत असते.
- सुरेश मांग, सोनगड, गुजरात
..
गावखेड्यांत नंदीबैल खेळ दाखवला जातो. नागरिकांची गर्दी असते. सायंकाळी पुन्हा वस्तीवर जाणे असा नित्यक्रम एकदीड महिना सुरू असतो. त्यानंतर पुन्हा दुसऱ्या तालुक्यात स्थलांतर करतो.
- रमन गौड, सोनगड, गुजरात
------------
बैलाला हिरवा चारा, धान्य, गूळ-खोबरे असे पौस्टिक खाद्य द्यावे लागते. धष्टपुष्ट बैल असल्याने त्यांच्या खाण्यापिण्याची, तब्येतीची देखभाल करताना जमा झालेल्या पैशांतून त्यांची व्यवस्था केली जाते.
------------------
मोबाईल इंटरनेटच्या जमान्यात मैदानी खेळ, डोंबारी नंदीबैल, गारुडी, जादूगर, बोलक्या बाहुल्या इत्यादी करमणुकीचे खेळ सध्यस्थितीत दुर्मिळ झाले आहेत. तरी हातावर मोजण्याइतके कलावंत अद्यापही कला जिवंत ठेवत असल्याचे दिसून येत आहेत.