कोटकचा अनोखा कार इन्शुरन्स | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कोटकचा अनोखा कार इन्शुरन्स
कोटकचा अनोखा कार इन्शुरन्स

कोटकचा अनोखा कार इन्शुरन्स

sakal_logo
By

मुंबई, ता. २१ : गरज नसताना मोटारीचे विमा पॉलिसी संरक्षण तात्पुरते बंद केल्यास तेवढा हप्ताही लागणार नाही व त्या रकमेची सवलतही पॉलिसी नूतनीकरणाच्या वेळी मिळू शकेल, असा अनोखा कार इन्शुरन्स कोटक जनरल इन्शुरन्सने आणला आहे.

कोटक जनरल इन्शुरन्सचे एमडी व सीईओ सुरेश अग्रवाल यांनी आज येथे ही माहिती दिली. संरक्षण तात्पुरते बंद केल्यापोटीचा सवलत परतावा तीन प्रकारे मिळेल. तसेच संरक्षण बंद असतानाही विशिष्ट दुर्घटनांसाठी विमा संरक्षण मिळत राहील. अर्थात, त्यासाठी ही मोटार प्रवासात नसणे आवश्यक आहे. यासाठी कोटकचा कार विमा घेणाऱ्या ग्राहकांना कोटक मीटर ॲप डाऊनलोड करावे लागेल. त्यावर आपला पॉलिसी क्रमांक व अन्य तपशील नोंदवल्यावर ही योजना सुरू होईल. ज्या दिवशी मोटार प्रवासात नसेल त्या दिवशी आपल्याला विम्याची गरज नसल्यामुळे पॉलिसी तात्पुरती बंद करता येईल. पॉलिसी किमान एक दिवस बंद केली, तरच तिचा हप्ताही लागणार नाही. याचा परतावा आपल्याला पॉलिसीचे पुढील नूतनीकरण करताना मिळू शकेल. तो रोख स्वरूपात किंवा पुढील पॉलिसीच्या रकमेतून ते पैसे वळते करून किंवा पुढील पॉलिसीतील तेवढ्या रकमेचे दिवस वाढवून मिळू शकतो; मात्र ही रक्कम जास्तीत जास्त पॉलिसी रकमेच्या ४० टक्केच असेल, असेही अग्रवाल म्हणाले.


मोटार पार्किंगमध्ये असतानाही विमा संरक्षण
-----------------------------------------
पॉलिसी संरक्षण तात्पुरते बंद केल्यावर मोटार प्रवासात असेल तर अर्थातच या संरक्षण सवलतीचा लाभ मिळणार नाही; मात्र पॉलिसी संरक्षण बंद असताना मोटार पार्किंगमध्ये ठेवली असेल तर ॲक्ट ऑफ गॉड या सदरात मोडणाऱ्या गोष्टींनी मोटारीचे नुकसान झाल्यास (उदा. दंगे, पूर, चोरी) त्याची नुकसानभरपाई मिळू शकते, असे सुरेश अग्रवाल यांनी सांगितले.