आश्रम शाळेत मिठाईचे वाटप | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आश्रम शाळेत मिठाईचे वाटप
आश्रम शाळेत मिठाईचे वाटप

आश्रम शाळेत मिठाईचे वाटप

sakal_logo
By

कांदिवली, ता. २१ (बातमीदार) ः आम्ही स्वावलंबी प्रतिष्ठानच्या वतीने मालाड मार्वे येथील स्नेह सागर आश्रमात रविवारी (ता. २०) शालोपयोगी वस्तूंचे व मिठाईवाटप करण्यात आले. संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन आम्ही स्वावलंबी प्रतिष्ठानचे अध्यक्ष घनश्याम देटके, सचिव संदीप पिसाळ व खजिनदार निखिल चव्हाण यांनी केले. आश्रम शाळेतील मुलांची सर्व सभासदांनी आपुलकीने विचारपूस केली. महापालिकेच्या मराठी माध्यमाच्या शाळेत शिकत असलेल्या विद्यार्थ्यांसह आपुलकी जिव्हाळा निर्माण झाला. विद्यार्थ्यांसह गप्पा मारताना, त्यांना इतर काही शैक्षिणक साहित्यांची गरज असल्याचे समोर आले. या वेळी आम्ही स्वावलंबी प्रतिष्ठानच्या वतीने आश्रमातील व्यवस्थापनास पुढील कार्यक्रमातून गरज असलेल्या शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात येईल, असे आश्वासन देण्यात आले.