पोलिसांनी जप्त केलेली दुचाकी चोरीला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पोलिसांनी जप्त केलेली दुचाकी चोरीला
पोलिसांनी जप्त केलेली दुचाकी चोरीला

पोलिसांनी जप्त केलेली दुचाकी चोरीला

sakal_logo
By

भाईंदर, ता. २१ (बातमीदार) : वाहतूक पोलिसांनी कारवाईदरम्यान जप्त केलेली दुचाकी चोरीला गेल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी वाहतूक पोलिसांनी नयानगर पोलिस ठाण्यात दुचाकी चोरीची तक्रार दाखल केली आहे. वाहतूक विभागातील महिला पोलिस कर्मचारी सुलभा होनमाने या शनिवारी (ता. १९) सायंकाळी भाईंदर-काशीमिरा रस्त्यावर कर्तव्य बजावत होत्या. त्या वेळी एक महिला दुचाकीवरून विनाहेल्मेट येत असल्याचे त्यांना दिसले. कारवाईसाठी त्यांनी दुचाकी थांबवली आणि दोन्ही महिला विनाहेल्मेट असल्याने फोटो काढून वाहन जप्त केले. महिलेकडे परवान्याची मागणी केली असता परवाना दाखवण्यास नकार देत तिने पळ काढला. दरम्यान, होनमाने व त्यांचे सहकारी अन्य वाहनांवर कारवाई करण्यासाठी निघून गेले. काही वेळाने होनमाने जप्त केलेल्या दुचाकीजवळ आल्या असता दुचाकी त्या ठिकाणी नव्हती; मात्र परिसरातील हॉटेलमधील एका कर्मचाऱ्याने दुचाकी एक महिला व पुरुष येऊन घेऊन गेल्याचे सांगितले. त्यामुळे जप्त केलेली दुचाकी चोरीला गेल्याची तक्रार केली आहे.