राज्यपाल हुशारी गावालाच ठेवून आलेत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

राज्यपाल हुशारी गावालाच ठेवून आलेत
राज्यपाल हुशारी गावालाच ठेवून आलेत

राज्यपाल हुशारी गावालाच ठेवून आलेत

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. २१ : राज्यपाल भगतसिंग कोश्यारी महाराष्ट्रात आले; पण उत्तराखंडमधील आपल्या गावी हुशारी ठेवून आले आहेत. त्यांची आणि हुशारीची गळाभेट करायला, त्यांना परत गावाला पाठवून द्यायला पाहिजे, अशा शब्दांत मनसेचे आमदार राजू पाटील यांनी खोचक टीका केली आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी वादग्रस्त विधान केल्याने राज्यपालांवर सर्व स्तरांतून टीका होत आहे. मनसे आमदार राजू पाटील यांनीही त्यांचा समाचार घेतला आहे.

दिवा येथील आयोजित एका कार्यक्रमास मनसे आमदार पाटील उपस्थित होते. या वेळी पत्रकारांनी त्यांना विचारले असता कोश्यारी यांच्या विधानाविषयी त्यांनी आपले मत व्यक्त केले. कोश्यारी यांच्यावर आम्ही बोलण्यापेक्षा भाजपने बोलले पाहिजे, असे म्हणत त्यांनी भाजपचीदेखील कानउघाडणी केली. आपण इतिहास बदलू शकत नाही. त्याचा ऊहापोह होणे गरजेचे आहे. काही गोष्टी माहीत नसताना त्याच्यावर जी उत्तरे दिली जातात, त्या वेळची परिस्थिती काय होती, त्या वेळी लिहिलेले जे पत्र आहे त्याचे संदर्भ काय आहेत, अशा गोष्टींचा विचार न करता, सरसकट जी मते व्यक्त केली जातात ती चुकीची आहेत. राज्यपाल इतिहासावरून राजकारण करत असल्याचा आरोप आमदार पाटील यांनी केला.