जवाहर विद्याभवनचे शिक्षक जखमी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जवाहर विद्याभवनचे शिक्षक जखमी
जवाहर विद्याभवनचे शिक्षक जखमी

जवाहर विद्याभवनचे शिक्षक जखमी

sakal_logo
By

चेंबूर, ता. २१ (बातमीदार) ः चेंबूर येथील वाशीनाका परिसरातील लोकमान्य शिक्षण संस्था जवाहर विद्याभवन मराठी माध्यमिक विद्यालयातील शिक्षक, कर्मचारी शनिवारी लोणावळ्याला सहलीला गेले होते. रविवारी मुंबईला परतत असताना बसचे ब्रेक निकामी होऊन झालेल्‍या अपघातात सात शिक्षकांसह कर्मचारी जखमी झाले आहेत. त्यांना उपचारांकरिता खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
जवाहर विद्याभवन मराठी माध्यम विद्यालयातील एकूण १३ शिक्षक व कर्मचारी शनिवारी दुपारी लोणावळा येथील एकविरा, महड येथे सहलीला गेले होते. रविवारी सकाळी देवीचे दर्शन घेऊन मुंबईला परत येताना संध्याकाळी बस लोणावळा येथील टायगर पॉइंटजवळ पोहचताच अचानक गाडीचे ब्रेक फेल झाले. चालकाने गाडी थांबवण्याचा प्रयन्त केला असता गाडी थांबेना म्हणून शेवटी चालकाने गाडी दगडाला ठोकली. त्यामुळे गाडी पुढे जाऊन पलटली. यात कर्मचारी राजू हिपलकर, ग्रंथपाल सोनू पडणेकर यांच्या डोक्याला व हाताला मार लागला आहे. त्यांना पनवेल येथील एमजीएम रुग्णालयात उपचारांकरिता दाखल केले आहे. त्‍यांच्‍यासोबत अन्‍य पाचजण किरकोळ जखमी झाले आहेत.