शताब्दी बनणार प्रमुख शिक्षण केंद्र | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शताब्दी बनणार प्रमुख शिक्षण केंद्र
शताब्दी बनणार प्रमुख शिक्षण केंद्र

शताब्दी बनणार प्रमुख शिक्षण केंद्र

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २२ : कांदिवलीतील भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय लवकरच डॉक्टरांसाठी शिकण्याचे प्रमुख केंद्र बनणार आहे. रुग्णालयात अलीकडेच केपी कॉन २०२२ कॅम्पसमध्ये कान, नाक आणि जीभ (ईएनटी) विभागाशी संबंधित थेट शस्त्रक्रियेसाठीचे दोन दिवसीय हँड-ऑन प्रशिक्षण आयोजित केले होते. उपनगरीय रुग्णालयात याआधी कधीही अशा प्रकारे परिषदेचे आयोजन करण्यात आले नव्हते. पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणात शेकडो ज्येष्ठ व तरुण डॉक्टर्स उपस्थित होते.
डिप्लोमेट ऑफ नॅशनल बोर्ड (डीएनबी) कोर्स सुरू झाल्यापासून रुग्णालय मोठ्या शस्त्रक्रियांच्या क्षेत्रात चांगले काम करत आहे. हा अभ्यासक्रम सुरू झाल्यापासून कॉक्लियर इम्प्लांट करणारे आंबेडकर रुग्णालय हे पहिले उपनगरीय रुग्णालय ठरले आहे. रुग्णालयाने आयोजित केलेल्‍या कार्यशाळेत कॉक्लियर इम्प्लांटवरील शस्त्रक्रिया, कर्करोगाच्या आणि कर्करोग नसलेल्या दोन्ही मानेतील ट्यूमर आणि इतर महत्त्वाच्या शस्त्रक्रिया तज्ज्ञांद्वारे केल्या गेल्या.


शस्त्रक्रियेत (एमएस) मध्ये मास्टर्स पूर्ण केलेल्या डॉक्टरांना प्रशिक्षण देण्यासाठी रुग्णालयाद्वारे दोनदिवसीय प्रशिक्षण सत्राचे आयोजन करण्यात आले होते. उपनगरीय रुग्णालयात पहिल्यांदाच आयोजित करण्यात आलेले हे प्रमुख प्रशिक्षण सत्रांपैकी एक आहे, ज्यामध्ये डॉ. के. पी. मोरवानी यांच्या मार्गदर्शनात २५ डॉक्टर सराव करत होते.
– डॉ. अजय गुप्ता, वैद्यकीय अधिकारी, आंबेडकर रुग्णालय

लाइव्ह शस्त्रक्रिया सत्रांना इतर राज्यातील डॉक्टरांसह १५० हून अधिक प्रतिनिधी उपस्थित होते. पालिका आता उपनगरीय रुग्णालये मजबूत करण्यावर लक्ष केंद्रित करत आहे. अलीकडेच आम्ही डीएनबी अभ्यासक्रम सुरू केले आहेत, ज्यामुळे आरोग्य सेवेच्या बाबतीत विद्यार्थी आणि रुग्ण दोघांनाही मदत होईल. आम्ही अशा जास्तीत जास्त कार्यशाळेचे आयोजन करण्याचा विचार करत आहोत जेणेकरून डॉक्टरांना तज्ज्ञांकडून प्रत्यक्ष अनुभव मिळेल.
– डॉ. विद्या ठाकूर, मुख्य वैद्यकीय अधीक्षक