मराठा ठोक मोर्चाची निदर्शने | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मराठा ठोक मोर्चाची निदर्शने
मराठा ठोक मोर्चाची निदर्शने

मराठा ठोक मोर्चाची निदर्शने

sakal_logo
By

मुंबादेवी, ता. २१ (बातमीदार) : छत्रपती शिवाजी महाराज यांच्‍याबद्दल राज्‍यपाल भगतसिंह कोश्यारी व भाजप खासदार सुधांशू चतुर्वेदी यांनी केलेल्‍या वक्‍तव्‍याचे पडसाद सर्वत्र उमटत आहेत. सोमवारी (ता. २१) दुपारी दक्षिण मुंबईतील आझाद मैदान येथे मराठा ठोक मोर्चाच्या रमेश केरे पाटील यांच्या नेतृत्वात राज्यपाल व खासदार चतुर्वेदी यांच्या छापील पोस्टरवर जोडे मारत निषेध केला.
दरम्‍यान, रमेश केरे पाटील यांना आझाद मैदान पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांच्यावर पोलिस कारवाई सुरू आहे. वरिष्ठ पोलिस निरीक्षक भूषण बेळणेकर यांनी रमेश केरे पाटील यांना ताब्यात घेत पोलिस ठाण्यात नेले. अहमदनगर आणि संभाजी नगर येथून आलेल्या सुरेखा सांगळे, युवराज सूर्यवंशी, महेश राणे, सुनंदा वामन, दफेदार आकीब, मतीन खान यांच्‍यासह अन्‍य कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी झाले होते.