कोपरखैरणेत गांजाची विक्री करणारा जेरबंद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कोपरखैरणेत गांजाची विक्री करणारा जेरबंद
कोपरखैरणेत गांजाची विक्री करणारा जेरबंद

कोपरखैरणेत गांजाची विक्री करणारा जेरबंद

sakal_logo
By

नवी मुंबई (वार्ताहर) : कोपरखैरणेतील झोपडपट्टीत गांजाची विक्री करणाऱ्या एकाला कोपरखैरणे पोलिसांनी रविवारी (ता. २०) रात्री अटक केली. रमेश साहेबराव शिंदे (वय ४७) याच्याजवळ सापडलेला सुमारे पावणेतीन किलो वजनाचा ३२ हजार रुपये किमतीचा गांजा पोलिसांनी जप्त केला. रमेश शिंदे ही व्यक्ती मूळची उस्मानाबाद जिह्यातील असून सध्या ती कोपरखैरणेतील बालाजी सिनेमासमोरील झोपडपट्टीत राहावयास आहे. रविवारी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास तो बालाजी सिनेमासमोरील बांधकाम चालू असलेल्या साई वृंदावन सोसायटीच्या मोकळ्या रस्त्यावर अमली पदार्थाची विक्री करत होता. याबाबतची माहिती मिळाल्यानंतर कोपरखैरणे पोलिसांनी घटनास्थळी जात त्याला ताब्यात घेतले. त्यानंतर पोलिसांनी त्याच्याजवळील पिशवीची तपासणी केली असता, त्यात सुमारे पावणेतीन किलो वजनाचा गांजा सापडला. सहायक पोलिस उपनिरीक्षक श्याम जाधव यांनी स्वत: फिर्याद देत त्याच्याविरोधात एनडीपीएस कायद्यानुसार गुन्हा दाखल केला.