कलाशिखर पुरस्काराने वैजयंतीमाला बाली यांचा गौरव | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कलाशिखर पुरस्काराने वैजयंतीमाला बाली यांचा गौरव
कलाशिखर पुरस्काराने वैजयंतीमाला बाली यांचा गौरव

कलाशिखर पुरस्काराने वैजयंतीमाला बाली यांचा गौरव

sakal_logo
By

मुंबई ः संगीत कला केंद्र पुरस्कार सोहळ्यात प्रतिष्ठेच्या आदित्य विक्रम बिर्ला कलाशिखर पुरस्काराने महान नृत्यांगना डॉ. वैजयंतीमाला बाली यांचा गौरव करण्यात आला. हा पुरस्कार त्यांना संगीत कला केंद्राच्या (एसकेके) अध्यक्षा राजश्री बिर्ला यांच्या हस्ते देण्यात आला. एसकेके पुरस्कारांची सुरुवात १९९६ मध्ये त्यांचे महान संस्थापक दिवंगत आदित्य विक्रम बिर्ला यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ करण्यात आली आणि हे पुरस्कार परफॉर्मिंग आर्टसच्या क्षेत्रातील त्यांच्या समृद्ध वारशाचे प्रतीक आहेत. त्याचबरोबर ख्यातनाम शास्त्रीय नृत्यांगना श्रीमती अन्वेषा महंता आणि कथकलीसाठी ओळखल्या जाणाऱ्या श्री.
कलामंडलम आदित्यन यांचाही आदित्य बिर्ला कलाकिरण पुरस्कारांनी गौरव करण्यात आला. डॉ. कनक रेळे, चित्रा विश्वेश्वरन, दर्शना झवेरी आणि जयंत कस्तूर यांचा एसकेके पुरस्कारांच्या परीक्षक मंडळात समावेश होता हा पुरस्कार सोहळा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, कुमार मंगलम बिर्ला, नीरजा बिर्ला, अनन्या बिर्ला, आर्यमन बिर्ला आणि वासवदत्त बजाज यांच्या उपस्थितीत पार पडला.