दिवा येथे गटार बांधाकामाचा शुभारंभ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दिवा येथे गटार बांधाकामाचा शुभारंभ
दिवा येथे गटार बांधाकामाचा शुभारंभ

दिवा येथे गटार बांधाकामाचा शुभारंभ

sakal_logo
By

दिवा, ता. २३ (बातमीदार) ः दिवा पोस्ट ऑफिस, मुंब्रादेवी कॉलनी रोड परिसरातील गटारांच्या बांधकामासाठी मनसे आमदार राजू पाटील यांनी आपल्या आमदार निधीतून पैसे दिले. या कामाची सुरुवात करण्यासाठी ते दिवा येथे आले होते. या वेळी भाजप कार्यकारिणी सदस्य विजय अनंत भोईर यांच्या हस्ते नारळ वाढवून कामाचा शुभारंभ करण्यात आला. पाटील यांनीच त्यांना यासाठी गळ घातली. त्यानंतर मनसेचे दिवा येथील विभाग अध्यक्ष तुषार पाटील यांनी आणि राजू पाटील यांनी नारळ वाढवून कामाचा आरंभ केला.


दिवा पोस्ट ऑफिस, मुंब्रादेवी कॉलनी रोड परिसरात गेल्या कित्येक वर्षांपासून गटारांची समस्या होती. गटारे बांधली; परंतु त्यातून सांडपाणीच वाहत नव्हते. पावसाळ्यात पावसाचे पाणी आणि सांडपाणी या गटारांमधून न जाता ते थेट मुंब्रादेवी कॉलनी रस्त्यावर येत असे. त्यामुळे तेथे राहणाऱ्या नागरिकांना, शाळेत जाणाऱ्या मुलांना या घाण पाण्यातूनच जावे लागत होते. ही समस्या मनसे आमदार राजू पाटील यांच्या निदर्शनास आल्यावर त्यांनी ही गटारे तोडून पुन्हा नव्याने बांधण्यासाठी आमदार निधीतून पैसे देण्याचे कबूल केले. या कामाचा आरंभ करण्यासाठी ते स्वतः सोमवारी (ता. २१) दिव्यात आले. या वेळी स्थानिकांनी प्रचंड संख्येने उपस्थित राहून प्रतिसाद दिला. या वेळी आमदार राजू पाटील यांनी स्थानिकांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. लवकरात लवकर या समस्या सोडवण्याचे आश्वासन दिले. स्थानिकांनी पाणीप्रश्न, लाईट बिल आदी प्रश्न त्यांच्यासमोर मांडले. या वेळी तुषार पाटील आणि आमदार राजू पाटील यांनी स्वतः पायी फिरून त्या परिसराची पाहणी केली.