संत साधू वासवानी पुतळ्याचे सुशोभीकरण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

संत साधू वासवानी पुतळ्याचे सुशोभीकरण
संत साधू वासवानी पुतळ्याचे सुशोभीकरण

संत साधू वासवानी पुतळ्याचे सुशोभीकरण

sakal_logo
By

उल्हासनगर, ता. २३ (वार्ताहर) ः बाळासाहेबांची शिवसेना या पक्षाचे शहरप्रमुख राजेंद्रसिंह भुल्लर यांच्या मागणीनुसार खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी उल्हासनगर येथील सिंधी संतांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या सुशोभीकरणासाठी ७५ लाख रुपयांची मंजुरी दिली आहे. गोलमैदानच्या दर्शनी भागात व खासदार जनसंपर्क कार्यालयासमोर सिंधी संत साधू वासवानी यांचा जुना पूर्णाकृती पुतळा आहे. पुतळ्याच्या आजुबाजूच्या परिसराची दुरवस्था झाली आहे.

पुतळ्याची दुरवस्था झाल्याने बाळासाहेबांची शिवसेनेचे शहरप्रमुख राजेंद्रसिंह भुल्लर यांनी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांना निवेदन दिले. संत साधू वासवानी यांच्या पुतळ्याच्या सुशोभीकरणासाठी ७५ लाख रुपये मिळावेत, अशी मागणी केली. ही मागणी मान्य करत डॉ. शिंदे यांनी तात्काळ ७५ लाख रुपयांचा निधी मंजूर केला. या वेळी जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, माजी नगरसेवक, उपशहरसंघटक अरुण आशान आदी उपस्थित होते. संत साधू वासवानी यांच्या पुतळ्याच्या सुशोभीकरणाचे काम निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्यावर लवकरात लवकर सुरू करण्यात येणार असल्याची माहिती राजेंद्रसिंह भुल्लर-महाराज यांनी दिली.