सई पाटील करणार तीन हजार किलोमीटर सायकल भ्रमंती | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सई पाटील करणार तीन हजार किलोमीटर सायकल भ्रमंती
सई पाटील करणार तीन हजार किलोमीटर सायकल भ्रमंती

सई पाटील करणार तीन हजार किलोमीटर सायकल भ्रमंती

sakal_logo
By

ठाणे, ता. २२ (बातमीदार) : ठाण्याची जलपरी म्हणून ओळखली जाणारी सई पाटील हिने आता नवीन उपक्रम हाती घेतला आहे. सईने अरुणाचल प्रदेश ते गेटवे ऑफ इंडिया असा एकूण ३००० किलोमीटरचा विश्वविक्रमी सायकल भ्रमंती करण्याचा निर्धार केला आहे. या प्रवासात सई झाडे वाचवा, प्लास्टिक वापर टाळा, असा संदेश देत १ डिसेंबर रोजी तिच्या प्रवासाला सुरुवात करणार आहे.
ठाण्याची सायकल गर्ल सई हिने या आधीही खूप विक्रमी प्रयोग केले आहेत. आता पुन्हा एकदा ती एक नवीन विक्रम करण्यासाठी सज्ज झाली असून सई ६ राज्यांतून आपला सायकल प्रवास करणार आहे. २६ नोव्हेंबर रोजी सई तिच्या निवासस्थानापासून अरुणाचल प्रदेशसाठी रवाना होणार असून १ डिसेंबर रोजी अरुणाचल प्रदेश येथून ती तिचा ३००० हजार किलोमीटरचा प्रवास सुरू करणार आहे. पश्‍चमम बंगाल, बिहार, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि अखेर महाराष्ट्र असा हा प्रवास असणार आहे.