अंबरनाथमध्ये राज्यपाल कोश्यारी यांचा निषेध | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अंबरनाथमध्ये राज्यपाल कोश्यारी यांचा निषेध
अंबरनाथमध्ये राज्यपाल कोश्यारी यांचा निषेध

अंबरनाथमध्ये राज्यपाल कोश्यारी यांचा निषेध

sakal_logo
By

अंबरनाथ, ता. २२ (बातमीदार) : छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल बेताल वक्तव्य केल्याप्रकरणी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि सुधांशू त्रिवेदी यांचा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि युवा सेना यांच्यातर्फे निषेध करण्यात आला. शिवसेना शहर शाखेपासून छत्रपती शिवाजी महाराज चौकपर्यंत राज्यपाल कोश्यारी आणि सुधांशू त्रिवेदी यांच्याविरोधात ‘चले जाव, चले जाव कोश्यारी चले जाव’ अशी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. या वेळी माजी नगराध्यक्ष आणि उपजिल्हाप्रमुख विजय पवार, उपजिल्हा संघटक अंजली राऊत, शहर संघटक संभाजी कळमकर, माजी नगरसेवक उत्तम आयवळे, माजी नगरसेविका पूनम येरुणकर, शहर सचिव स्वप्नील भामरे आणि पदाधिकारी या वेळी उपस्थित होते.