राज्यपाल, भाजप प्रवक्ते त्रिवेदी यांच्या विरोधात काँग्रेसचे आंदोलन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

राज्यपाल, भाजप प्रवक्ते त्रिवेदी यांच्या विरोधात काँग्रेसचे आंदोलन
राज्यपाल, भाजप प्रवक्ते त्रिवेदी यांच्या विरोधात काँग्रेसचे आंदोलन

राज्यपाल, भाजप प्रवक्ते त्रिवेदी यांच्या विरोधात काँग्रेसचे आंदोलन

sakal_logo
By

शहापूर, ता. २२ (बातमीदार) : राज्यपाल भगतसिंग कोश्यारी व भाजप प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या बेताल वक्तव्याचे पडसाद शहापुरात उमटले. त्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी शहापूर तालुका काँग्रेस व भिवंडी तालुका ग्रामीण काँग्रेसच्या वतीने शिवतीर्थ शहापूर येथे निषेध आंदोलन करण्यात आले.
या वेळी कोश्यारी व त्रिवेदी यांच्याविरोधात घोषणा देऊन त्यांच्या प्रतिमांना जोडे मारून निषेध करण्यात आला. यावेळी शहापूर तालुका अध्यक्ष महेश धानके, सेवादल जिल्हा अध्यक्ष प्रकाश भांगरथ, भिवंडी तालुका अध्यक्ष विजय पाटील, जिल्हा सरचिटणीस पंकज गायकवाड यांनी आपल्या मनोगतातून कोश्यारी व त्रिवेदी यांचा समाचार घेतला. आंदोलनास ज्येष्ठ नेते पद्माकर केव्हारी, प्रांतिक सदस्य रवींद्र परटोले, पर्यावरण जिल्हा अध्यक्ष रामचंद्र जोशी, जिल्हा चिटणीस प्रभाकर शेळके, जिल्हा उपाध्यक्ष आबा देशमुख, शहापूर शहर अध्यक्ष संजय तांबोळी, ओबीसी प्रदेश सचिव जितेश विशे, सोशल मीडिया भिवंडी अध्यक्ष बाळा हुकमाळी, सेवादल तालुका अध्यक्ष दशरथ भोईर, लक्ष्मण निचिते, संतोष ठाकरे, नितीन चंदे आदी पदाधिकारी उपस्थित होते.