भाकरीवाडी पुलाजवळील खड्डा ठरतोय धोकादायक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

भाकरीवाडी पुलाजवळील खड्डा ठरतोय धोकादायक
भाकरीवाडी पुलाजवळील खड्डा ठरतोय धोकादायक

भाकरीवाडी पुलाजवळील खड्डा ठरतोय धोकादायक

sakal_logo
By

किन्हवली, ता. २२ (बातमीदार) : दोनच वर्षांपूर्वी अॅन्युईटी हायब्रीड प्रकल्पांतर्गत शेणवा ते देहरी या नव्याने बांधलेल्या रस्त्यावर भाकरीवाडी पुलाजवळ रस्त्याच्या मधोमध मोठा खड्डा पडला असून दिवसेंदिवस त्याचा आकार वाढत आहे. वाहनांचे नियंत्रण सुटल्याने अपघात होत असून हा खड्डा दिवसेंदिवस जीवघेणा ठरत आहे. यापूर्वीही जुलै महिन्यांत पडलेल्या खड्ड्याचे वृत्त ‘सकाळ’ने प्रसिद्ध करताच तो भरपावसात तत्काळ बुजविण्यात आला होता.
२०१८ मध्ये शहापूर तालुक्यात अॅन्युईटी हायब्रिड या महत्त्‍वाकांक्षी प्रकल्पांतर्गत शेणवा-किन्हवली-सरळगाव-देहरी या ३० किलोमीटर मार्गाचे काम सुरू करण्यात आले होते. अनिस इन्‍फ्रास्ट्रक्चर या मुख्य ठेकेदार कंपनीने पोटठेकेदार म्हणून नेमलेल्या मिलन रोड बिल्डटेक या कंपनीद्वारे २०२० च्या अखेरीस रस्त्याचे काम काही अंशी पूर्णत्वास नेले. हा रस्ता रहदारीस खुला केल्यानंतर मात्र दीड वर्षांच्या काळातच या रस्त्यावर काही ठिकाणी खड्डे पडले असून साईडपट्ट्या वाहून गेल्या आहेत. काँक्रीटीकरण केलेल्या रस्त्यांना भेगा पडल्या आहेत. ठेकेदार कंपनीकडे या रस्त्याच्या देखभाल दुरुस्तीची दहा वर्षांपर्यंत जबाबदारी असूनही कंपनीकडून याकडे कानाडोळा केला जात आहे.
----------------------------------
रस्त्यावर पडलेल्या खड्ड्याविषयी ठेकेदार कंपनीच्या व्यवस्थापकास कळवून खड्डा ताबडतोब भरण्याविषयी कार्यवाही करण्यात येईल.
- अक्षय केंजळे, शाखा अभियंता, सार्वजनिक बांधकाम उपविभाग, शहापूर