मालाडमध्‍ये दुकानांवर हातोडा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मालाडमध्‍ये दुकानांवर हातोडा
मालाडमध्‍ये दुकानांवर हातोडा

मालाडमध्‍ये दुकानांवर हातोडा

sakal_logo
By

मालाड, ता. २२ (बातमीदार) ः मालाड पश्चिमेतील रेल्‍वे स्‍थानकाजवळ असलेल्या मालाड शॉपिंग सेन्टरलगतच्या अनधिकृत दुकानांवर पालिकेने कारवाई केली. शॉपिंग सेन्टरलगत असलेले जवळपास आठ ते दहा व्यावसायिक गाळे पालिका पी उत्तर विभागाने हटवले. या गाळ्यांबाबत पालिकेला अनेक तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्यानुसार २२ नोव्हेंबर रोजी दुपारच्या दरम्यान पालिकेने कारवाई केली. याप्रसंगी पालिकेच्या पथकासह पोलिसांचाही मोठा फौजफाटा उपस्थित होता.