धारावी मुख्य रस्त्याने घेतला मोकळा श्वास | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

धारावी मुख्य रस्त्याने घेतला मोकळा श्वास
धारावी मुख्य रस्त्याने घेतला मोकळा श्वास

धारावी मुख्य रस्त्याने घेतला मोकळा श्वास

sakal_logo
By

धारावी, ता. २२ (बातमीदार) : धारावीत दर सोमवारी दुकाने बंद ठेवण्यात येतात; याचाच फायदा घेत धारावी मुख्य रस्त्यावर दर सोमवारी किरकोळ साहित्य विक्रीचा बाजार बसतो. हा बाजार ‘सोमवार बाजार’ म्हणून ओळखले जाते. हा बाजार बंद केला जावा, अशी मागणी करत महाराष्ट्र नवनिर्माण सेना धारावी विधानसभातर्फे आंदोलन करण्यात आले होते. त्याची गंभीर दखल घेत पोलिस व पालिका प्रशासनाने सोमवारी (ता. २१) धारावी मुख्य रस्त्यावर गस्त ठेवून फेरीवाल्यांना बसू दिले नाही. यामुळे रस्त्याने मोकळा श्वास घेतला. स्थानिक रहिवाशांनी यामुळे सुटकेचा निश्वास सोडला आहे. दर सोमवारी पोलिस व पालिका प्रशासनाने पहारा ठेवून बाजार परत भरणार नाही याची व्यवस्था करावी, अशी मागणी होत आहे.
मात्र धारावी मुख्य रस्त्यावरील फेरीवाले जवळ असलेल्या संत कक्कया मार्गावर बसून व्यवसाय करू लागले आहेत. याकडे पोलिसांनी व पालिकेने लक्ष देणे गरजेचे असल्याचे स्थानिक रहिवासी सचिन चौगुले यांनी सांगितले.