औद्योगिक क्षेत्रातील रस्त्याचे कामे प्रगतीपथावर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

औद्योगिक क्षेत्रातील रस्त्याचे कामे प्रगतीपथावर
औद्योगिक क्षेत्रातील रस्त्याचे कामे प्रगतीपथावर

औद्योगिक क्षेत्रातील रस्त्याचे कामे प्रगतीपथावर

sakal_logo
By

वाशी, ता. २२ (बातमीदार) : नवी मुंबई औद्योगिक क्षेत्र हे आशिया खंडातील सर्वात मोठा औद्योगिक क्षेत्र म्हणून ओळखले जाते. मात्र नवी मुंबईतील औद्योगिक क्षेत्रातील अंतर्गत रस्त्याची चाळण झाली झाल्याने उद्योजकांना याचा मनस्ताप सहन करावा लागत आहे. औद्योगिक क्षेत्रामधील वाहनांच्या वर्दळीमुळे रस्त्यांच्या अवस्था दयनीय झाली आहे. त्यामुळे औद्योगिक क्षेत्रामधील टीटीसी इंडस्ट्रीयल भागात तीस किलोमीटर रस्त्यांचे काँक्रीटीकरण करण्यात येणार आहे. नवी मुंबई महापालिका १५ किलोमीटर व एमआयडीसी १५ किलोमीटर रस्त्यांची दुरुस्ती करणार आहे. पालिकेच्या वतीने एमआयडीसीमधील तुर्भे येथील सी ब्लॉक व कोपरखैरणे येथील ए ब्लॉकमध्ये काम सुरू आहे. या रस्त्याचे काम प्रगतिपथावर असून जानेवारीपर्यंत काम पूर्ण होणार असल्याचा विश्वास शहर अभियंता संजय देसाई यांनी व्यक्त केला. सी ब्लॉकमध्ये पालिकेकडून ५.८७ किलोमीटरचे काम हे ९६ कोटी रुपये खर्च करून करण्यात येत आहे; तर कोपरखैरणे येथील ए ब्लॉक मध्ये ९५ कोटी रुपये खर्च करून करण्यात येऊन ५.६७ किलोमीटर रस्ते करण्यात येत आहे. या रस्त्याच्या कामांमध्ये ५०० झाडे वाचवण्यात येऊन रस्त्याचे काम सुरू आहे; पण काही पर्यावरणप्रेमींनी झाडांचे नुकसान होत असल्यामुळे हरकत घेतल्याने एमआयडीसीकडून बांधण्यात येणाऱ्या रस्त्याचे काम रखडले आहे; परंतु पालिकेच्या रस्त्यांची असणारी कामे पूर्ण होत असल्याने उद्योजकांना दिलासा मिळणार आहे.