मुरबाड तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने आंदोलन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मुरबाड तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने आंदोलन
मुरबाड तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने आंदोलन

मुरबाड तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने आंदोलन

sakal_logo
By

मुरबाड, ता. २२ (बातमीदार) : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी मुरबाड तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने मुरबाड येथे शिवाजी चौकात निदर्शने करण्यात आली.
औरंगाबाद येथे झालेल्या पदवीदान समारंभात भगतसिंह कोश्यारी यांनी शिवाजी महाराजांबद्दल बेताल वक्तव्य केले होते. याचा निषेध व्यक्त करण्यासाठी मुरबाड येथे आंदोलन करण्यात आले. या वेळी युवक काँग्रेस तालुकाध्यक्ष धनाजी बांगर, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष दीपक वाघचौडे, महिला काँग्रेस तालुकाध्यक्ष संध्या कदम, तालुका सचिव भगवान तारमळे, महिला शहराध्यक्ष शुभांगी भराडे, नेताजी लाटे, विलास जाधव, वसंत कराळे, दिनेश जाधव, साईनाथ कंटे, प्रकाश पवार, स्वप्नील जाधव आदी पदाधिकारी उपस्थितीत होते. धरणे झाल्यानंतर मुरबाड पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक अनिल सोनवणे यांच्यामार्फत राष्ट्रपतींना निवेदन देऊन राज्यपाल कोश्यारी यांची हकालपट्टी करून योग्य व्यक्तीची निवड करावी, अशी मागणी निवेदनात केली.