कोकण मराठी साहित्य परिषदच्या पुरस्कारासाठी आवाहन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कोकण मराठी साहित्य परिषदच्या पुरस्कारासाठी आवाहन
कोकण मराठी साहित्य परिषदच्या पुरस्कारासाठी आवाहन

कोकण मराठी साहित्य परिषदच्या पुरस्कारासाठी आवाहन

sakal_logo
By

पालघर, ता. २२ (बातमीदार) : कोकण मराठी साहित्य परिषदेतर्फे दिल्या जाणाऱ्या विविध वाङ्‍मयीन पुरस्कारासाठी कोमसापच्या सभासद लेखकाकडून पुस्तके पाठवण्याचे आवाहन समितीचे निमंत्रक प्रा. अशोक ठाकूर यांनी केले आहे. हे सर्व पुरस्कार कोमसापच्या कोकणातील सभासद असणाऱ्या कवी व लेखकांसाठीच मर्यादित आहेत. प्रथम श्रेणीचे सात पुरस्कार प्रत्येकी पाच हजार रुपये, सन्मानचिन्ह व सन्मानपत्र असे आहेत. हे सात पुरस्कार कादंबरी, कथा, कविता, समीक्षा, ललित गद्य, चरित्र-आत्मचरित्र व चित्रपटविषयक पुस्तकांकरिता दिले जातात. र. वा. दिघे कादंबरी पुरस्कार, गुर्जर कथासंग्रह पुरस्कार, आरती प्रभू कवितासंग्रह पुरस्कार, अनंत काणेकर ललित गद्य पुरस्कार, प्रभाकर पाध्ये समीक्षा पुरस्कार, धनंजय कीर चरित्र पुरस्कार, भाई भगत चित्रपट नाट्यविषयक पुरस्कार यांचा समावेश आहे. पुरस्कारासाठी पुस्तकाच्या दोन प्रती स्पीड पोस्टाने अथवा कुरिअरने ३१ डिसेंबर २०२२ पर्यंत पुरस्कार समितीचे निमंत्रक प्राध्यापक अशोक ठाकूर, द्वारा सोनोपंत दांडेकर महाविद्यालय, पालघर, तालुका- जिल्हा पालघर या पत्त्यावर पाठवावेत. अधिक माहितीसाठी ९९७०८०६२६७ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.