तृतीय पंथीच्या घरी चोरी करणाऱ्यास अटक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

तृतीय पंथीच्या घरी चोरी करणाऱ्यास अटक
तृतीय पंथीच्या घरी चोरी करणाऱ्यास अटक

तृतीय पंथीच्या घरी चोरी करणाऱ्यास अटक

sakal_logo
By

नालासोपारा, ता. २२ (बातमीदार) : नालासोपाऱ्यात एका तृतीयपंथीच्या घरातून लाखो रुपयांचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम चोरणाऱ्या चोरट्याला तुळिंज पोलिसांनी अवघ्या २४ तासांत अटक केली. राहुल गाथाडे असे अटक आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने नालासोपारा पूर्वेकडील मोरेगाव नालेश्वरनगर परिसरात राणाऱ्या एका तृतीयपंथीच्या घरातून नऊ तोळे सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा लाखोंचा ऐवज चोरला होता. याबाबत तुळिंज पोलिस ठाण्यात तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तांत्रिक बाबी व गुप्त बातमीदाराच्या मदतीने चोरट्याला अटक केली आहे.
पोलिसांचे आवाहन
नालासोपारा वसई विरार परिसरात दिवसेंदिवस चोरीचे प्रमाण वाढत चालले आहे. पोलिस या चोरट्यांची धरपकड करीत आहेत; मात्र नागरिकांनीही आपले दागिने व पैसे सुरक्षित ठिकाणी ठेवावे, असे आवाहन तुळिंज पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र कांबळे यांनी केले आहे.