वसई-विरार राष्ट्रीय मॅरेथॉनची जय्यत तयारी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वसई-विरार राष्ट्रीय मॅरेथॉनची जय्यत तयारी
वसई-विरार राष्ट्रीय मॅरेथॉनची जय्यत तयारी

वसई-विरार राष्ट्रीय मॅरेथॉनची जय्यत तयारी

sakal_logo
By

वसई, ता. २२ (बातमीदार) : वसई-विरार महापालिका राष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धा यंदा ११ डिसेंबर रोजी पार पडणार आहे. या स्पर्धेत देशभरातील धावपटूंचा मोठा सहभाग असणार आहे. या स्पर्धेत एकूण १८ हजारांहून अधिक स्पर्धक सहभागी होणार असल्याची माहिती आयुक्त अनिल कुमार पवार यांनी दिली.
वसई पश्चिम येथे राष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धेची माहिती देण्यासाठी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी आयुक्त पवार, अतिरिक्त आयुक्त आशीष पाटील, मुंबई क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष पंकज ठाकूर, स्थायी समितीचे माजी सभापती संदेश जाधव, माजी सभापती भरत गुप्ता, वसई कला क्रीडा समितीचे सचिव प्रकाश वनमाळी, माजी नगरसेवक हार्दिक राऊत, सहायक आयुक्त ग्लिसन गोन्साल्विस, क्रीडा विभागाचे प्रमुख दिगंबर पाटील उपस्थित होते.
वसई-विरार शहर महापालिका व वसई तालुका कला क्रीडा विकास मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. यावर्षी एलिट अॅथलीट तसेच हौशी धावपटूंसाठी बक्षिसांच्या रक्कमेत तब्बल १८ लाख रुपयांनी वाढ करून एकूण ५४ लाख रुपयांची बक्षिसे दिली जाणार आहेत, अशी माहिती अनिल कुमार पवार यांनी दिली.
--------------------
मोफत राहण्याची सोय
प्रत्येक स्पर्धकाला ३ डी फिनिशर मेडल, एक लोडेड गुडी बॅग, गरम नाश्ता, जगभर वैध असलेले टायमिंग सर्टिफिकेट आणि मोफत फिनिश फोटो मिळेल. याशिवाय, सर्व बाहेरगावातून सहभागी धावपटूंना मोफत राहण्याची सोय केली जाईल आणि त्यांच्या सर्वांची जेवणाची काळजी महानगरपालिकेकडून घेतली जाईल.
--------------------
वसई विरार महापालिकेला अॅथलेटिक्स फेडरेशन ऑफ इंडिया (एएफआय) या संस्थेने मान्यता दिली असून, या स्पर्धेच्या रुटचे मोजमाप आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन संघटनेने (एआयएमएस) प्रमाणित केले आहे आणि हे प्रमाणपत्र ‘जागतिक अॅथलेटिक्स’द्वारे प्रमाणित केले आहे.
------------------
शासकीय अधिकारी, कर्मचारीही धावणार
मॅरेथॉन स्पर्धेत राष्ट्रीय स्तरावरचे धावपटू सहभाग घेणार आहेत. याशिवाय शासकीय अधिकारी, कर्मचारीदेखील नागरिकांना सुदृढतेचे धडे देण्यासाठी स्पर्धेत हिरिरीने सहभाग घेणार असल्याची माहिती आयुक्त अनिल कुमार पवार यांनी दिली.
--------------------
पुरुषांच्या पूर्ण मॅरेथॉन एलिट फील्डमध्ये अनिश थापा आणि श्रीनू बुगाथा हे उपस्थित राहणार आहेत. दोघेही राष्ट्रकुल खेळ स्पर्धेतील खेळाडू आहेत; तर पूर्ण मॅरेथॉन विजेत्याला तीन लाख रुपयांचे, तर हाफ मॅरेथॉन विजेत्याला दोन लाख रुपयांचे बक्षीस देण्यात येणार आहे.
------------------
स्पर्धकांना वाव
जे स्पर्धक सध्या भारतात आहेत व त्यांना वसई विरार मॅरेथॉनमध्ये सहभाग घ्यायची इच्छा असेल, अशा धावपटूंनादेखील सहभागी होता येणार आहे. त्यामुळे नवीन स्पर्धकांना प्रोत्साहन मिळेल, अशी माहिती मॅरेथॉन समन्वय समितीचे सदस्य प्रकाश वनमाळी यांनी दिली.
--------------------
१५ गटांत स्पर्धा
.....
४० डॉक्टर मोटरसायकलसह तैनात
१४ वैद्यकीय स्थानके
७ कार्डियोलॉजी रुग्णवाहिका
२० सामान्य रुग्णवाहिका
५० परिचारिका
१०० वॉर्डबॉय
स्थानिक दवाखाने खुले
१७ मेडिकल सेशन
२१ वॉटर सेशन