एस. व्ही. कुलकर्णी इंग्रजी वक्तृत्व स्पर्धेचा निकाल जाहीर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

एस. व्ही. कुलकर्णी इंग्रजी वक्तृत्व स्पर्धेचा निकाल जाहीर
एस. व्ही. कुलकर्णी इंग्रजी वक्तृत्व स्पर्धेचा निकाल जाहीर

एस. व्ही. कुलकर्णी इंग्रजी वक्तृत्व स्पर्धेचा निकाल जाहीर

sakal_logo
By

ठाणे, ता. २२ (बातमीदार) : सतीश प्रधान ज्ञानसाधना महाविद्यालयात दरवर्षी आयोजित करण्यात येणारी व ठाणे शहरात इंग्रजी भाषेतील प्रतिष्ठेची मानली जाणारी स. वि. कुलकर्णी आंतरमहाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धा पार पडली. यंदा ठाणे आणि मुंबई परिसरातील १९ विविध महाविद्यालयांतील ३६ स्पर्धक स्पर्धेत सहभागी झाले होते.
विलेपार्ले येथील साठ्ये महाविद्यालयातील प्रा. सुनील पाटील आणि डोंबिवलीतील प्रगती महाविद्यालयातील प्रा. नूतन पाटील यांनी परीक्षण केले. इंग्रजी विषयप्रमुख प्रा. संगीता बावीस्कर यांच्या अध्यक्षतेखालील आयोजन समिती, स्पर्धेच्या संयोजिका प्रा. उत्तरा जोशी, प्रा. मल्हारी शिरतोडे, प्रा. नेहा शेरकर, प्रा. वर्षा वाणी, प्रा. सतीश मदाळे, प्रा. प्रल्हाद सोनवणे, प्रा. धनंजय राख यांनी नियोजनात मोलाची भूमिका निभावली. या स्पर्धेत रिवा सिंग-एन. एम. कॉलेज, परळ हिने फिरत्या चषकासह प्रथम पारितोषिक पटकावले. द्वितीय व तृतीय क्रमांकाचे पारितोषिक अनुक्रमे सतीश प्रधान ज्ञानसाधना महाविद्यालय ठाणे येथील ऐश्वर्या चोक्रोबर्थी आणि त्रेजश्री कुराडे यांनी पटकावले. विजेत्यांना चषक व रोख रक्कम; तर सर्व स्पर्धकांना प्रमाणपत्र देण्यात आले. डी. जी. रुलारेल महाविद्यालय, माहीम मुंबई यांनी दोन उत्तेजनार्थ बक्षिसे पटकावली; तर भिवंडी येथील बी. एन. एन महाविद्यालयाने एक उत्तेजनार्थ बक्षीस जिंकले.