ठाकरे गटाच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्‌घाटन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ठाकरे गटाच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्‌घाटन
ठाकरे गटाच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्‌घाटन

ठाकरे गटाच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्‌घाटन

sakal_logo
By

कळवा, ता. २२ (बातमीदार) : कळवा पूर्व येथील पौंडपाडा म्हात्रे कंपाऊंड येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्‌घाटन करण्यात आले. या कार्यालयाचे उद्‌घाटन ज्येष्ठ व स्थानिक शिवसैनिक विश्वास देसाई यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी शिवसेनेचे विधानसभा क्षेत्रातील जिल्हा पातळीवरील सर्व पदाधिकारी, कळवा, विटावा, खारीगावमधील सर्व विभागप्रमुख, शाखाप्रमुख आणि सर्व आजी-माजी पदाधिकारी उपस्थित होते. याप्रसंगी कल्याण जिल्हा महिला आघाडी संपर्कप्रमुख यांनी सुमारे ३० महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांसमवेत शाखेला भेट देऊन महिलांना मार्गदर्शन केले.