बस थांब्यावर गर्दुल्‍यांचे ठाण बस थांब्यावर गर्दुल्‍यांचे ठाण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बस थांब्यावर गर्दुल्‍यांचे ठाण 
बस थांब्यावर गर्दुल्‍यांचे ठाण
बस थांब्यावर गर्दुल्‍यांचे ठाण बस थांब्यावर गर्दुल्‍यांचे ठाण

बस थांब्यावर गर्दुल्‍यांचे ठाण बस थांब्यावर गर्दुल्‍यांचे ठाण

sakal_logo
By

नेरूळ, ता. २२ (बातमीदार) : नवी मुंबई मनपा परिवहन उपक्रमाच्या माध्यमातून विविध ठिकाणी बस थांबे बांधण्यात आले आहेत; मात्र नेरूळमधील बस थांब्यांच्या शेडमध्ये भिकारी, बेघर व्यक्ती, गर्दुल्ले यांनी वस्ती केल्यामुळे प्रवाशी नाराजी व्यक्त करत आहेत.

नेरूळमधील विविध ठिकाणी बस थांब्यांच्या शेडमधील प्रवाशांसाठी असलेल्या आसन व्यवस्थेवर अशा प्रकरे अतिक्रमण झाल्याने प्रवाशांना बसच्या प्रतीक्षेत उन्हात ताटकळत उभे राहावे लागत आहे. नवी मुंबईतील प्रवाशांना एनएमएमटी आणि बेस्ट बसेसची विविध बस थांब्यांवर तासनतास वाट पाहावी लागते. त्यामुळे परिवहन विभागाच्या वतीने बस शेल्टरची निर्मिती करण्यात आली. परंतु नेरूळमधील बांचोली चौकजवळीक बस स्टॉप, नेरूळ सेक्टर-३ मधील बस स्थानक, सारसोळे बस स्थानकासारख्या अनेक ठिकाणी सर्रास भिकारी, गर्दुल्ल्‍यांनी आपले ठाण मांडले आहे. त्यामुळे प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे यावर परिवहन विभागाने लवकरात लवकर कारवाई करावी. तसेच या ठिकाणी सुरक्षा रक्षक तैनात करावेत, अशी मागणी प्रवाशी वर्गातून होत आहे.

-------------------------------------------
बस शेल्टरमध्ये आराम करणारे नागरिक जागा अडवत असतील तर त्याच्यावर कारवाई केली जाईल, तसेच सारसोळे बस डेपोतील प्रकरणी नेरूळ पोलिस ठाण्यात तक्रार करण्यात आली आहे.
- योगेश कडूस्कर, व्यवस्थापक, परिवहन उपक्रम, नवी मुंबई पालिका