अज्ञात समाजकंटकांचा आवरे शाळेत हौदोस | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अज्ञात समाजकंटकांचा आवरे शाळेत हौदोस
अज्ञात समाजकंटकांचा आवरे शाळेत हौदोस

अज्ञात समाजकंटकांचा आवरे शाळेत हौदोस

sakal_logo
By

उरण, ता. २२ (वार्ताहर) : अल्पावधीत नावलौकिक झालेल्या आवरे येथील रामचंद्र म्हात्रे विद्यालयात मागील काही दिवसांपासून समाजकंटकांनी हैदोस घातला असून शाळेत जाळपोळ करण्याचा प्रयत्न केला; तर शाळेतील पंखे आणि इतर सामानाची नासधूस करण्यात आली आहे. या प्रकारामुळे शाळेतील विद्यार्थी आणि शिक्षक दहशतीच्या छायेत वावरत आहेत. पोलिसदेखील या प्रकाराची दखल घेत नसल्यामुळे पालक आणि शिक्षकांमध्ये संताप व्यक्त करण्यात येत आहे. उरण तालुक्यात आवरे गावातील रामचंद्र म्हात्रे या विद्यालयात ५ वी ते १२ वीपर्यंत ८५४ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. गुरुवारी (ता. १७) काही समाजकंटकांनी रात्री शाळेतील टेबल जाळत, शाळेच्या किचनमधील गॅस शेगडी पेटवून त्यावर शाळेतील कागदपत्रे आणि पुस्तके जाळली. एका नागरकिाला रात्री शाळेत काही जळत असल्याचे दिसल्यानंतर ही आग विझविण्यात आली, त्यामुळे शाळा जळण्यापासून वाचली. याबाबत शाळा प्रशासनाने उरण पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. आता पुन्हा एकदा सोमवारी (ता. २१) रात्री अज्ञात समाजकंटकांनी शाळेत शिरून शाळेतील दोन वर्गांतील पंखे वाकवून इतर सामानाची नासधूस केली. तसेच विद्यार्थ्यांना मिळणारे शालेय पोषण आहारातील धान्य, डाळी या वर्गांमध्ये आणि वऱ्हांड्यात पसरून दिल्या.