बेकायदेशीर पिस्तुल बाळगणारा तरुण अटकेत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बेकायदेशीर पिस्तुल बाळगणारा तरुण अटकेत
बेकायदेशीर पिस्तुल बाळगणारा तरुण अटकेत

बेकायदेशीर पिस्तुल बाळगणारा तरुण अटकेत

sakal_logo
By

नवी मुंबई, ता. २२ (वार्ताहर) : वाशीतील जुहूगाव परिसरात पिस्तूल घेऊन वावरणाऱ्या तरुणाला वाशी पोलिसांनी अटक केली. सोनू होतम सिंग (वय २९) असे या तरुणाचे नाव असून पोलिसांनी त्याच्याजवळ असलेले पिस्तूल आणि १० राऊंड जप्त केले आहेत. या तरुणाने हे पिस्तूल कोठून व कशासाठी आणले, याबाबत पोलिसांकडून अधिक चौकशी करण्यात येत आहे.
२१ नोव्हेंबर रोजी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास वाशीतील मॅग्नेट आर्केस्ट्रा बारजवळ एक व्यक्ती पिस्तूल घेऊन फिरत असल्याची माहिती वाशी पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी वाशीतील जूहुगाव येथील मॅग्नेट आर्केस्ट्रा बारजवळ धाव घेत तरुणाला ताब्यात घेतले. त्याच्याकडून पिस्तूल आणि १० राऊंड जप्त करण्‍यात आले. पोलिसांनी सोनू होतम सिंग याच्याविरोधात बेकायेशीर पिस्तूल बाळगल्याप्रकरणी तसेच भारतीय हत्यार कायद्यानुसार गुन्हा दाखल करून त्याला अटक केली. या तरुणाने हे पिस्तूल कुठून व कशासाठी आणले, याबाबत पोलिसांकडून अधिक तपास करण्यात येत आहे.