पक्षी सप्ताह उत्साहत साजरा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पक्षी सप्ताह उत्साहत साजरा
पक्षी सप्ताह उत्साहत साजरा

पक्षी सप्ताह उत्साहत साजरा

sakal_logo
By

वाशी, ता. २१ (बातमीदार) : मारुती चित्तमपल्ली यांचा ५ नाव्हेंबर रोजी जन्मदिवस व १२ नोव्हेंबर रोजी डॉ. सलीम अली यांची पुण्यतिथी असते. या दिनांचे औचित्य साधून महाराष्ट्र शासनाने ५ ते १२ नोव्हेंबर हा सप्ताह पक्षी सप्ताह म्हणून साजरा करण्याचे निर्देश दिले. ज्याद्वारे देशातील या दोन दिग्गज पक्षी अभ्यासकांना मानवंदना देत पक्ष्यांविषयी जनजागृती होईल. यावर्षीच्या पक्षी सप्ताहाच्या निमित्ताने नवी मुंबई कांदळवन कक्ष आणि कांदळवन प्रतिष्ठानाने शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी कांदळवन आणि पक्षी निरीक्षण सहलींचे आयोजन केले. त्यात साधारण ७० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. तसेच बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीच्या संयुक्त विद्यमाने ३० विद्यार्थ्यांकरिता पक्षी टॅक्सीडेर्मी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. ऑनलाइन क्विझचेही आयोजन करण्यात आले होते. या सप्ताहाच्या निमित्ताने पक्षी फोटोग्राफी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. यात बिहेव्हर, पोर्ट्रेट, निसर्गाची कला, मानववंश या ४ श्रेणींमध्ये फोटो मागवण्यात आले. ज्यात साधारण १०० फॉटोग्राफरनी भाग घेतला. त्यातील ११ फॉटोग्राफरना विविध श्रेणी अंतर्गत बक्षिसे देण्यात आली; तर १२ नोव्हेंबरच्या ऐरोली येथे संपन्न झालेल्या सप्ताहसमाप्ती सोहळ्यात विजेत्यांची घोषणा करण्यात आली आणि ३० महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी मरीन मटर्स लेक्चर सीरिजअंतर्गत संजय मोंगा यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.