महापालिकेच्या प्रयोगशाळेला राष्‍ट्रीय मानांकन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

महापालिकेच्या प्रयोगशाळेला राष्‍ट्रीय मानांकन
महापालिकेच्या प्रयोगशाळेला राष्‍ट्रीय मानांकन

महापालिकेच्या प्रयोगशाळेला राष्‍ट्रीय मानांकन

sakal_logo
By

मुंबई, ता. २२ : मुंबई महापालिकेकडून यापुढच्या काळात खासगी विकसकांच्या बांधकामाच्या साहित्याचे नमुने तसेच बांधकाम साहित्याची तपासणी करणे शक्य होणार आहे. पालिकेच्या प्रयोगशाळेस एनएबीएलमार्फत नुकतेच राष्ट्रीय मानांकन मिळाले आहे. त्यामुळे पालिकेला यापुढच्या काळात विभागांतर्गत तसेच खासगी संस्था आणि व्यावसायिकांच्याही साहित्याचे नमुने तपासणे शक्य होणार आहे.
पालिकेने या प्रयोगशाळेची क्षमतावाढ करतानाच अत्याधुनिक अशी साधनसामग्रीही बसवलेली आहे. त्यामुळे पालिकेच्या प्रयोगशाळेत चाचण्यांची संख्याही वाढणार आहे. या प्रयोगशाळेच्या विस्तारामुळे पालिकेला महसूलही प्राप्त होणार आहे. त्यामुळे खासगी क्षेत्रात काम करणाऱ्या बांधकाम व्यावसायिकांनाही ही चाचणीची सुविधा उपलब्ध होईल, अशी माहिती दक्षता विभागाचे सहआयुक्त अजित कुंभार यांनी दिली.
मुंबईभर पालिकेच्या विविध विभागांकडून विकासाची अनेक नवीन कामे तसेच दुरुस्‍ती आणि देखभालीची कामे करण्‍यात येतात. या कामांमध्‍ये वापरण्‍यात येणाऱ्याया सामग्रीची तपासणी करण्‍यासाठी प्रमुख अभियंता (दक्षता) विभागाच्‍या देखरेखीखाली महापालिकेची प्रयोगशाळा वरळी येथे सन १९५८ पासून कार्यरत आहे. पालिकेच्‍या रस्‍ते, पूल, इमारत बांधकाम, इमारत देखभाल तसेच दुरुस्‍ती, मुंबई मलःनिसारण प्रकल्‍प, मलःनिसारण प्रचालन, जल अभियंता, पाणीपुरवठा प्रकल्‍प, पर्जन्‍य जलवाहिन्‍या, रुग्णालये, उद्याने इत्‍यादी खात्‍यामार्फत तसेच २४ विभाग पातळीवर अनेक प्रकारची तांत्रिक कामे करण्‍यात येत असतात. या कामांमध्‍ये वापरण्‍यात येणाऱ्या सामग्रीचा दर्जा निर्धारित मानकांप्रमाणे तपासण्‍यासाठी ही प्रयोगशाळा कार्यरत आहे. या प्रयोग शाळेत सिमेंट, सळई तसेच लोखंड, खडी, विटा, रेती, लाकूड, लादी, डांबर, असफाल्‍ट, काँक्रीट इत्‍यादी बांधकाम साहित्‍याच्‍या नमुन्‍यांची चाचणी करून दर्जा तपासण्‍यात येतो.
...
गुणवत्ता तपासणी
महापालिकेच्‍या साहित्‍य चाचणी प्रयोगशाळेची केंद्र शासनाच्‍या राष्‍ट्रीय परीक्षण अंश-शोधन प्रयोगशाळा आणि मान्‍यता मंडळ (NABL) या संस्‍थेकडून पाहणी करण्‍यात आली. सोई-सुविधांचे, तंत्रज्ञानाचे तसेच तंत्रज्ञांचे परीक्षण करून गुणवत्ता तपासण्‍यात आली. त्यानंतर राष्‍ट्रीय मानांकनाचा दर्जा पारित करण्‍यात आला असून तसे प्रमाणपत्र देण्‍यात आले आहे.