निकृष्ट कामे करणाऱ्या कंत्राटदारांना आठ कोटीचा दंड | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

निकृष्ट कामे करणाऱ्या 
कंत्राटदारांना आठ कोटीचा दंड
निकृष्ट कामे करणाऱ्या कंत्राटदारांना आठ कोटीचा दंड

निकृष्ट कामे करणाऱ्या कंत्राटदारांना आठ कोटीचा दंड

sakal_logo
By

मुंबई, ता. २२ ः मुंबई महापालिकेच्या विविध विभागांकडून कोट्यवधींची कामे केली जातात. या कामांतील त्रुटींवर लक्ष ठेवत दक्षता विभागाकडून कारवाई केली जाते. त्यानुसार यंदा १ एप्रिलपासून आतापर्यंत दक्षता विभागाने केलेल्या कारवाईत सुमारे आठ कोटींचा दंड वसूल करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.
मुंबई महापालिकेत रस्ते, पूल, इमारतींचे बांधकाम, दुरुस्ती, खरेदी आदी विविध प्रकल्पांच्या होणाऱ्या कामांतील त्रुटींवर पालिकेच्या दक्षता विभागाचे लक्ष असते. त्यांच्याकडून कामाचा आढावा घेतला जातो. त्यात निकृष्ट दर्जाचे काम, खर्चात अनियमितपणा, हलगर्जीपणा, नियमबाह्य कामांवर दक्षता विभागाकडून प्रकाशझोत टाकला जातो. त्यात त्रुटी आढळल्यास दक्षता विभागाकडून कारवाई केली जाते. त्यानुसार १ एप्रिल २०२२ पासून आतापर्यंत झालेल्या विविध कामांतील त्रुटींवरून दक्षता विभागाने संबंधित कंत्राटदारांवर सुमारे ८ कोटीचा दंड वसूल केला असल्याचे संबंधित विभागातून सांगण्यात आले.
---
त्रुटींनुसार कारवाई
काही निकृष्ट दर्जाच्या कामांसाठी संबंधित कंत्राटदारांना सुधारणा करण्यासाठी मुदत दिली जाते. या मुदतीत सुधारणा केली की नाही, याची खातरजमा करण्यासाठी दक्षता विभाग तपासणी करते. सुधारणा न आढळल्यास प्रसंगी नियमानुसार कारवाई केली जाते. अनेक मोठ्या घोटाळ्यांच्या प्रकरणात पोलिस केस, न्यायालयीन कारवाई, काळ्या यादीत टाकणे अशी कारवाईही केली जात असल्याचे संबंधित विभागाकडून सांगण्यात आले.