सामान्य, डिजिटल होर्डिंगचा दर समान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सामान्य, डिजिटल होर्डिंगचा दर समान
सामान्य, डिजिटल होर्डिंगचा दर समान

सामान्य, डिजिटल होर्डिंगचा दर समान

sakal_logo
By

मुंबई, ता. २२ ः मुंबईत डिजिटल जाहिरात होर्डिंग्ज उभारणाऱ्या कंपन्यांना प्रोत्साहित करण्यासाठी मुंबई महापालिकेने शुल्क कमी केले आहे. सामान्य जाहिरात होर्डिंग्ज आणि डिजिटल होर्डिंगचे दर समान ठेवले आहेत. डिजिटल जाहिरात होर्डिंग्ज कंपन्यांना आकर्षित करण्यासाठी पालिकेने हा निर्णय घेतला असल्याची माहिती पालिकेच्या संबंधित अधिकाऱ्याने दिली.
मुंबई सुशोभीकरण कार्यक्रमांतर्गत पालिकेने शहरात डिजिटल होर्डिंग्ज उभारण्याचा निर्णय घेतला आहे, परंतु संबंधित जाहिरात कंपन्यांनी शुल्क जास्त असल्याने त्यात सवलत मिळावी अशी मागणी केली होती. मुंबईत जाहिरात होर्डिंग्ज लावण्यासाठी पालिकेकडून डिजिटल होर्डिंगसाठी स्क्वेअर फुटासाठी १४० रुपये शुल्क आकारण्यात येत होते. सामान्य जाहिरात होर्डिंगसाठी १०० रुपये शुल्क घेतले जात होते. पावसाळ्यात डिजिटल होर्डिंगमध्ये पाणी जाणे किंवा इतर समस्या उद्भवल्यास कंपन्यांचे नुकसान होते. शिवाय, पालिका आकारत असलेले दर जास्त आहेत, ते परवडत नसल्याने हे दर कमी करावेत, अशी मागणी कंपन्यांकडून केली जात होती. कंपन्यांचा मिळणारा प्रतिसाद कमी होऊ नये यासाठी पालिकेने त्यांच्या मागणीचा विचार करून शुल्क कमी केले आहे.
...
१०० रुपये प्रतिचौरस फूट
सामान्य होर्डिंगसाठी स्क्वेअर फुटांसाठी १०० रुपये शुल्क आकारले जाते. त्यानुसार डिजिटल होर्डिंग्ज कंपन्यांनाही १०० रुपये शुल्क आकारण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. त्यामुळे या दोन्ही प्रकारच्या होर्डिंगना आता समान दर आकारले जाणार आहेत. या निर्णयामुळे डिजिटल जाहिरात कंपन्या प्रोत्साहित होतील, असे पालिकेला वाटते आहे.