शहरातील पालिका शाळेला सीबीएससी बोर्डाची मान्यता नाही. | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शहरातील पालिका शाळेला सीबीएससी बोर्डाची मान्यता नाही.
शहरातील पालिका शाळेला सीबीएससी बोर्डाची मान्यता नाही.

शहरातील पालिका शाळेला सीबीएससी बोर्डाची मान्यता नाही.

sakal_logo
By

बेलापूर, ता. २२ (बातमीदार) : शहरातील सामान्य वर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांना उत्कृष्ट शिक्षण मिळावे हा प्रमुख उद्देश ठेवून पालिकेने ५ वर्षांपूर्वी सीबीएसई शाळा सुरू केल्या, परंतु या शाळेला सीबीएसई बोर्डाची परवानगी मिळली नाही. त्यामुळे या शाळांत शिकत असलेल्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भविष्य अंधारात आले आहे. यामुळे या विद्यार्थ्यांचे पालक चिंतेत पडले आहेत. विशेष म्हणजे सीबीएसई बोर्डाची पद्धत क्लिष्ट असल्याचे सांगण्यात येत असे असले, तरी राज्य शासनाच्या शिक्षण विभागाने मात्र त्यांना परवानगी दिली आहे.

पालिकेने आर्थिक दुर्बल गरीब वर्गातील विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण मिळावे या उद्देशाने नेरूळ येथे ९३ क्रमांकाची व बोनकोडे येथे ९४ क्रमांकाची शाळा २०१८ मध्ये सुरू केली. शाळांमध्ये आजच्या घडीला पूर्व प्राथमिक व प्राथमिक विभागाचे पाचवीपर्यंत वर्ग सुरू आहेत. नेरूळ येथील शाळेत पूर्व प्राथमिकचे ५५०; तर प्राथमिकचे ६२५ असे एकूण विद्यार्थी आहेत. या बोनकोडे शाळेत पूर्व प्राथमिकचे ५७४ आणि प्राथमिकचे ६६६ असे एकूण १२४४ विद्यार्थी शिक्षणाचे धडे घेत आहेत. शाळेच्या सुरुवातीपासून सीबीएसईची परवानगी घेणे गरजेचे असताना पाच वर्षे झाली तरीही आतापर्यंत सीबीएसई बोर्डाची परवानगी मिळाली नाही, परंतु यासाठी पालिकेचे प्रयत्न कमी पडल्याने या शाळांना अद्याप परवानगी मिळाली नसल्याची चर्चा पालक करत आहेत.

-----------
शाळा सुरू केली, परंतु शाळेला सीबीएसईची मान्यता नाही, ही धक्कादायक माहिती समोर आली आहे. जर हे सत्य असेल तर ही गंभीर बाब असून हजारो विद्यार्थ्यांचे भविष्य अंधःकारमय आहे. तरी चालू वर्षात मान्यता घ्यावी याकरिता गरज वाटल्यास नंदन म्हात्रे यांच्याकडून शंभर टक्के प्रयत्न केले जातील.
- भरत जाधव, माजी नगरसेवक, भाजप
------------
सीबीएसई म्हणजेच दिल्ली मंडळाच्या परवानगीसाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. त्यामुळे या शाळांना लवकरच परवानगी मिळेल.
- अरुणा यादव, शिक्षण अधिकारी, पालिका प्रशासन