भाजपच्या नेत्या रिदा रशीद यांच्या अटकेसाठी उपोषण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

भाजपच्या नेत्या रिदा रशीद यांच्या अटकेसाठी उपोषण
भाजपच्या नेत्या रिदा रशीद यांच्या अटकेसाठी उपोषण

भाजपच्या नेत्या रिदा रशीद यांच्या अटकेसाठी उपोषण

sakal_logo
By

कळवा, ता. २२ (बातमीदार) : भाजपच्या नेत्या रिदा रशीद यांच्याविरोधात ॲस्ट्रॉसिटी गुन्हा दाखल करून तीन दिवस उलटल्यानंतरही त्यांना अटक करण्यात आलेली नाही. त्याच्या निषेधार्थ बौद्ध उपासक-उपासिका समन्वय समितीचे उपाध्यक्ष प्रवीण पवार यांनी उपोषण सुरू केले आहे.

२६ ऑक्टोबर रोजी शिवा जगताप (रा. सम्राटनगर, मुंब्रा) हे मुंब्रेश्वर मंदिर येथील तलावाचे बांधकाम पाहण्यासाठी गेले होते. त्या वेळी तेथे उपस्थित असलेल्या रिदा रशीद, सिंकदर मुमताज अहमद खान आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी त्यांना मंदिर परिसरात येण्यापासून मज्जाव केला होता. त्यानंतर १३ नोव्हेंबर रोजी एका कार्यक्रमात त्यांना जातिवाचक शिवीगाळ केली होती. याप्रकरणी जगताप यांनी दाखल केलेल्या तक्रारीवरून मुंब्रा पोलिस ठाण्यात ॲस्ट्रॉसिटी गुन्हा दाखल केला आहे. त्यानुसार पोलिसांनी रिदा रशीद यांना नोटीस बजावली आहे. मात्र, तीन दिवस उलटल्यानंतरही त्यांना अटक करण्यात आलेली नाही. या निषेधार्थ प्रवीण पवार हे सोमवारपासून (ता. २१) उपोषणाला बसले आहेत. अद्यापही पोलिस यंत्रणेने त्यांचे उपोषण गांभीर्याने घेतले नसल्याचे म्हणत आपण हे उपोषण रशीद यांच्या अटकेपर्यंत सुरूच ठेवणार असल्याचा इशारा पवार यांनी दिला. अ‍ॅड. उत्तेकर आणि अ‍ॅड. म्हस्के यांनी मंगळवारी मुंब्रा पोलिसांची भेट घेऊन याप्रकरणी लवकरात लवकर कारवाई करावी; अन्यथा या प्रकरणी तपास स्थलांतरित करण्याबाबत आपण उच्च न्यायालयात याचिका दाखल करू, असा इशारा दिला.