टँकरच्या धडकेत तरुणाचा मृत्यू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

टँकरच्या धडकेत तरुणाचा मृत्यू
टँकरच्या धडकेत तरुणाचा मृत्यू

टँकरच्या धडकेत तरुणाचा मृत्यू

sakal_logo
By

चेंबूर, ता. २२ (बातमीदार) ः चेंबूर येथील आरसीएफ परिसरात एक तरुण दुचाकीवरून घरी परतत असताना टँकरने त्याला अचानक धडक दिली. त्यात तरुणाचा मृत्यू झाला आहे. साईनाथ इरकर असे मृत तरुणाचे नाव आहे. वाशीनाका परिसरातील कस्तुरबा नगरमध्ये आपल्या कुटुंबासह राहणारा साईनाथ हा नवी मुंबई येथील महाविद्यालयात बीएस्सी प्रथम वर्षात शिकत होता. शनिवारी दुपारी ही घटना घडली. तो आरसी मार्गावरून जात असताना त्याच दिशेने टँकर जात होता. तरुणाने ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला आणि त्याचा तोल जाऊन तो रस्त्यावर पडला असता टायरखाली येऊन त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. स्थानिक नागरिकांनी त्‍याला खासगी रुग्णालयात दाखल केले होते. त्याचा सोमवारी मृत्यू झाला. दरम्‍यान, टँकर जप्त करून पोलिस ठाण्यात ठेवण्यात आला आहे, अशी माहिती आरसीएफ पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक बी. एस. घावटे यांनी दिली आहे.